सलमानचा भाऊ अरबाज खान वयाच्या 57व्या वर्षी बाबा होणार?, 22 वर्षांनी लहान पत्नी गर्भवती आहे का?
Arbaaz khan second wife sshura khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा भाऊ आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता अरबाज खान सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण, म्हणजे तो वयाच्या 57व्या वर्षी अरबाज खान पुन्हा एकदा बाबा होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात हे गुपीत देखील आता उलघडले आहे. अरबाज खानपेक्षा तब्बल 22 वर्षांनी लहान असलेली त्याची पत्नी शूरा खान गर्भवती असल्याचे काही माध्यमातून समोर आले आहे. नेमकं काय घडलं, यावर नजर टाकूया.
शूरा खान गर्भवती आहे का?
अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शूरा खान त्यांच्या पहिल्या बाळाची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले जात आहे. या जोडप्याने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, लोकांना असे वाटते की शूरा खान गर्भवती आहे.

अरबाज खान 57 व्या वर्षी पुन्हा वडील होणार?
अरबाज खानने 2023 मध्ये शूरा खानशी दुसरे लग्न केले होते. आता अशी बातमी आहे की, अरबाज खान लवकरच वडील होऊ शकतो. खरं तर, एप्रिल 2025 मध्येच, अरबाज खानला शूरासोबत एका मॅटरनिटी क्लिनिकच्या बाहेर दिसले होते, तेव्हापासून बाळाबद्दल अटकळ बांधली जात आहे.
शूरा खान सैल कपड्यांमध्ये दिसली
आता अलिकडेच अरबाज खान आणि शूरा खान लंच डेटनंतर एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. दोघांचाही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अरबाज खान त्याची पत्नी शूराला पकडून पायऱ्यांवरून खाली नेताना दिसत आहे.
अरबाज खानने पायऱ्यांवरुन तिला उतरवले
या व्हिडिओमध्ये शूरा खान सैल कपड्यांमध्ये दिसत आहे. अशा परिस्थितीत, लोक म्हणत आहेत की, शूराने तिच्या गरोदरपणामुळे असे कपडे घातले असावेत. तर यावेळी अरबाज खान पांढऱ्या टी-शर्ट आणि डेनिममध्ये दिसला. त्या अभिनेत्याने त्याच्या पत्नीला हळू हळू खाली उतरण्यास सांगितले. मग शूरा गाडीच्या आत बसली.
शूरा आणि अरबाजच्या वयात 22 वर्षांचा फरक
मिळालेल्या माहितीनुसार, 57 वर्षीय अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 रोजी शूरा खानशी लग्न केले. त्यांच्या वयात 22 वर्षांचा फरक असल्याचे वृत्त आहे. लग्नापूर्वी हे जोडपे एक वर्ष एकमेकांना डेट करत होते. शुरा आणि अरबाजची पहिली भेट अरबाज खान निर्मित 'पटना शुक्ला' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. एकेकाळी शूरा खान ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांची वैयक्तिक मेकअप आर्टिस्ट होती.
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज खानने 1998 मध्ये मलायका अरोराशी लग्न केले. तथापि, 19 वर्षांच्या लग्नानंतर 2017 मध्ये या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना अरहान खान नावाचा एक मुलगा आहे, जो 22 वर्षांचा आहे. याशिवाय, शूरा खानचे यापूर्वीही लग्न झाले आहे आणि तिने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. शूराला तिच्या मागील लग्नापासून 8 वर्षांची मुलगी देखील आहे. हे त्यांचे दुसरे मूल असेल.












Click it and Unblock the Notifications