सुश्मिता सेनचा पत्ता कट; व्हॅलेंटाईनला ललित मोदींच्या आयुष्यात आलेली 'ती' दुसरी अभिनेत्री कोण?
उद्योजक ललित मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला होता. ललित मोदी आणि सुश्मिताचे फोटो समोर आल्यानंतर हे दोघेही चांगलेच ट्रोल झाले होते. आता ललित मोदींच्या आयुष्यात एक नवीन मुलगी आली आहे. व्हेलेंटाईन डेला ललित मोदी याने एक पोस्ट शेअर केल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालाय. आता ही अभिनेत्री कोण? आणि हे कधी जमलं? हे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

ललित मोदींची पोस्ट काय?
व्हेलेंटाईन डे ला ६१ वर्षांच्या ललित मोदीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ललित याच्यासोबत एक अभिनेत्री दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करून ललितने त्याचे प्रेम व्यक्त केलं. ललितने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, 'एकदा भाग्यवान... पण मी दोनदा भाग्यवान ठरलो. जेव्हा 25 वर्षांची मैत्री प्रेमात बदलते. असे दोनदा झाले. आशा आहे की प्रत्येकासाठी असेच असेल. तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओतील मुलगी कोण?
ललित मोदीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर या तरुणीची एकच चर्चा सुरु झाली. कुणाच्या मते ती अभिनेत्री आहे. या व्हिडिओसोबत ललितने त्या महिलेचं नाव उघड केलं नाही किंवा इतर कोणतीही माहिती दिली नाही. पण हा व्हॅलेंटाईन डे ललित मोदसाठी नक्कीच खास होता हे या व्हिडीओने निश्चित झाले. व्हिडिओमध्ये ललितने या महिलेसोबत घालवलेल्या खास क्षणांचा फोटो आहे, जो त्याने व्हिडिओ बनवून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
सुश्मितासोबत ब्रेकअप?
ललित मोदी याने 2022 मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत काही खासगी फोटो शेअर केले होते. त्यानंतर त्यानेच या दोघांमधील नात्याची कबुली दिली होती. फोटो पोस्ट करत ललितने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'जागतिक दौऱ्यानंतर. मालदीव सार्डिनिया कुटुंबासह आणि माझी बेटर हाफ सुष्मिता सेनसह. नवीन सुरुवात, नवीन जीवनासाठी खूप आनंद झाला.' परंतु हे फोटो शेअर झाल्यानंतर सुश्मिता सेनला टिकेचा सामना करावा लागला होता. आता ललित मोदीने दुसऱ्याच तरुणीसोबत व्हिडीओ पोस्ट केल्यानंत सुश्मिता सेन पुन्हा चर्चेत आली.












Click it and Unblock the Notifications