संगीत सोहळ्यातील अनंत अंबानींच्या त्या सोन्याचा नक्षीदार जॅकेटची चर्चा
मुंबई: आशियातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाचा रंगारंग सोहळा सुरु झाला आहे. ममरू फंक्शनने सुरू झालेल्या लग्नसोहळ्यानंतर शुक्रवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी खास संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींचे लूक समोर येत आहेत. पण खास संगीत सोह्ळ्यात अनंत अंबानी यांचा लुक इतरांपेक्षा हटके आणि खास दिसत होता. विशेष बाब म्हणजे राधिका मर्चंटचा लूक अनंत अंबानीच्या लूकच्या तुलनेत खूपच फिका पडला होता. चला दोघांच्या लुक्सबद्दल आपण जाणून घेऊया.

अनंत अंबानींचा करोडो रुपयांचा जॅकेट
संगीत रजनीत अनंत अंबानी यांनी निळ्या बेसवर डार्क गोल्डन वर्क असलेला सूट परिधान केला होता. त्याची नववधू राधिका मर्चंट प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या क्रिस्टल लेहेंग्यात दिसली. तिचा लूक सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने स्टाईल केला होता.
अनंत अंबानींच्या ड्रेसची खास गोष्ट
लेहेंग्यात ऑफ-शोल्डर क्रिस्टल स्टेटमेंट ब्लाउज आणि मल्टी-पॅनल स्कर्ट होता. ज्यावर चमकदार स्वारोवस्की क्रिस्टल्स एम्बेड केलेले होते. अनंत अंबानी यांनी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेली सोनेरी जरी, कसाब आणि सिक्विन एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेटही घातले होते. या ड्रेसची खास गोष्ट म्हणजे हे जरीचे काम खऱ्या सोन्यापासून बनवले होते. त्याच्या बटणावर डायमंड वर्क केले होते.
रॉयल बंगाल टायगर ब्रोचने लक्ष घेतले वेधून
अनंत अंबानी यांनी संगीत सोहळ्यासाठी सोन्याचे खरे जॅकेट परिधान केला होता. अनंतने आपला लूक पूर्ण करण्यासाठी पोनीटेल हेअरस्टाइलमध्ये केस बांधले होते.
अनंतच्या जॅकेटशिवाय, त्याच्या अनोख्या ब्रोचने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले. ब्रोचमध्ये रॉयल बेंगाल टायगरला हिऱ्याने जडवलेल्या बँडमध्ये मोठ्या माणिक सेटवर बसवलेले होते. तिचे हे ब्रोच प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर लॉरेन श्वार्ट्झ यांनी डिझाइन केले होते.












Click it and Unblock the Notifications