ऑपरेशन सिंदूरवर अमिताभ बच्चन यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया! वडिलांची कविता शेअर! काय म्हणाले बिग बी?
Amitabh Bachchan's first reaction on Operation Sindoor : पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशातून तीव्र प्रतिक्रीया आल्या. दरम्यान भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवले. यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करत पाकिस्तानची चांगलीच जिरवली.
सिंदूर ऑपरेशननंतर देशासह जगातून प्रतिक्रीया आली. या प्रतिक्रीयेत बाॅलीवूड कसे मागे राहणार, सोशल मीडियावर सर्वांनी आपापल्या प्रतिक्रीया दिल्या. सर्वांचे लक्ष बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रीयेकडे लक्ष होते. बिग बींची आज प्रतिक्रिया आली आहे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 15 दिवस भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यावर भारताच्या प्रतिक्रीयेनंतर 10 मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली. पण पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला. त्यानंतर 11 मे रोजी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
काय म्हणाले अमिताभ बच्चन?
अमिताभ बच्चन यांनी एक्सवर लिहिले की, त्या राक्षसाने सुट्टी साजरी करताना निष्पाप पती-पत्नीला बाहेर ओढले, पतीचे कपडे काढले. निर्दयतेने मारले. जेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला, तेव्हा पत्नी गुडघे टेकून रडत होती आणि तिच्या पतीला मारू नका अशी विनंती केल्यानंतरही; त्या भित्र्या राक्षसांनी तिच्या पतीला निर्घृणपणे गोळी मारली. जेव्हा पत्नी म्हणाली "मलाही मारून टाका", तेव्हा ते राक्षस म्हणाले "नाही, तू जाऊन हे "...." (मोदींचे नाव घेणे टाळले) ला सांग मुलीच्या मनःस्थितीवर, पूज्य बाबूजींच्या एका कवितेतील एक ओळ माझ्या मनात आली...
मानो, वो बेटी " .... " के पास गई, और कहा :है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया " .. (बाबूजी की पंक्ति)
तो " .... " ने दे दिया सिंदूर, OPERATION SINDOOR। जय हिन्द। जय हिन्द की सेना। तू ना थमें गा कभी ; तू न मुड़ेगा कभी ; तू न झुकेगा कभी कर शपथ , कर शपथ, कर शपथ। अग्नि पाथ! अग्नि पाथ ! अग्नि पाथ।
छुट्टियाँ मानते हुए, उस राक्षस ने, निर्दोष पति पत्नी को बाहर खींच कर, पति को नग्न कर, उसके धर्म की पूर्ति करने के बाद , उसे जब गोली मारने लगा, तो पत्नी ने, घुटने पे गिर कर, रो रो अनुरोध करने के बाद भी, की उसके पति को न मारो ; उसके पति को उस बुज़दिल राक्षस ने, बेहद...
अमिताभ बच्चन यांनी घटनेच्या 19 व्या दिवशी म्हटले की, त्यांनी दहशतवादी आणि एका पर्यटक महिलेमधील संभाषण लिहिले. पण जिथे जिथे पंतप्रधान मोदींचा उल्लेख होता तिथे त्यांनी "...." वापरला. यातूनही अनेक अर्थ काढले जात आहेत.












Click it and Unblock the Notifications