अमिताभ बच्चन हेच बॉलिवूडचे खरे 'शहेनशाह', आता टॅक्सच्या बाबतीत शाहरुख, सलमानला टाकले मागे
Amitabh Bachchan: गेल्या 50 वर्षांपासून सातत्याने भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन 82 वर्षांच्या वयातही एक मेगास्टार अभिनेते आहेत. वयाला फक्त एक संख्या मानणारे अमिताभ हे केवळ चित्रपट, टीव्ही किंवा जाहिरातींच्या जगात प्रभाव नाही तर करदात्यांच्या बाबतीतही ते सुपरबॉस ठरले आहेत.
दरम्यान 2024-25 या आर्थिक वर्षात अमिताभ बच्चन भारतातील सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी बनले आहेत. बॉलिवूडच्या या बादशहाने 15 मार्च 2025 रोजी त्याचा शेवटचा हप्ता भरला आहे. जो 52.50 कोटी रुपये आहे. या बाबतीत त्यांनी बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान आणि बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजेच सलमान खानलाही मागे टाकले आहे.

बीग बी यांनी यावर्षी 350 कोटीची केली कमाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार बीग बी अमिताभ बच्चन यांनी यावर्षी 350 कोटी रुपये कमावले आहेत. ज्यामुळे त्यांना 120 कोटी कर भरावा लागला आहे. गेल्या वर्षीच्या 71 कोटी रुपयांच्या करापेक्षा हे 69% जास्त आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की चित्रपटांव्यतिरिक्त, बिग बी जाहिराती आणि प्रसिद्ध क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' मधूनही भरपूर कमाई करतात.
आजही अमिताभ बच्चन हेच जाहिरात कंपन्यांची पहिली पसंती
एवढेच नाही तर त्याची रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक आहे. अमिताभ यांचे वय वाढले असेल पण त्यांचे चाहते कमी झाले नाहीत आणि त्यांची मागणीही कमी झाली नाही, म्हणूनच ते आजही जाहिरात कंपन्यांची पहिली पसंती आहेत.
शाहरुख आणि सलमानला टाकले मागे
यापूर्वी शाहरुख खानने गेल्या वर्षी 92 कोटी रुपये कर भरून हा किताब जिंकला होता. तर या वर्षी किंग खानने 84.17 कोटी रुपये आगाऊ कर भरला आहे तर सलमान खानने 75 कोटी रुपये कर भरला आहे. परंतु अमिताभ बच्चन यांचे योगदान खानपेक्षा 30% जास्त होते, ज्यामुळे ते भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या स्थानावरून टॉपच्या स्थानावर पोहोचले आहेत.
"एका वडिलांसाठी यापेक्षा अभिमानाची गोष्ट काहीही असू शकत नाही"
सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय असलेले अमिताभ बच्चन आजकाल खूप आनंदी आहेत. कारण त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनच्या #BeHappy या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमिताभ यांनी अलिकडेच ट्विट केले होते की, "एका वडिलांसाठी यापेक्षा अभिमानाची गोष्ट काहीही असू शकत नाही. बी हॅप्पीबद्दल मिळालेल्या कौतुकाने मी भारावून गेलो आहे. मला अभिषेकचा अभिमान आहे."
डान्स ड्रामा चित्रपटाचे कौतुक
बीहॅपी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक देशातील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा आहेत. रेमो यांनी अभिषेक बच्चन, इनायत वर्मा, नोरा फतेही आणि नासेर यांच्यासोबत एक डान्स ड्रामा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले आहे. हा चित्रपट 14 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.












Click it and Unblock the Notifications