Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रणबीर कपूर- आमिर खानचे भांडण, सोडवायला आला कर्णधार रोहित शर्मा; नेमका काय आहे, व्हायरल व्हिडीओ?

बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार अलिकडेच एकमेकांशी भिडल्याची बातमी आली. आमिर खान आणि रणबीर कपूर एकमेकांना समोर दात-ओठ खात असल्याचा फोटो व्हायरल झाला. दोघांमधील ही टक्कर चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे ही लढाई क्रिकेटर ऋषभ पंतमुळे सुरू झाली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन कलाकारांव्यतिरिक्त भारतीय संघातील सर्व क्रिकेटपटूही दिसत आहेत.

Dream11 video

कसे भिडले दोन कलाकार?

आमिर खान व रणबीर कपूर हे एकमेकांना भिडल्याचा एक व्हिडीओ समोर आला. तो खूप व्हायरलही झाला. खरंतर, हा व्हिडिओ ड्रीम ११ च्या जाहिरातीचा आहे. ड्रीम ११ च्या जाहिरातीत आमिर खान आणि रणबीर कपूर एकत्र दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना टोमणे मारत आहेत. या दोघांमधील हमरीतुमरी प्रेक्षकांना आवडली असल्याचे दिसत आहे.

कशामुळे झाले भांडण?

ही ड्रीम ११ ची जाहिरात क्रिकेटपटू ऋषभ पंतने सुरू होते. जेव्हा तो आमिरकडे येतो आणि म्हणतो की त्याला एक फोटो हवा आहे. पण त्याच्यासोबत नाही तर रणबीरसोबत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हसायला लागतो. आमिर नाराज नसल्याचं नाटक करतो. अमिर म्हणतो, तो फोटो नाही तर एक किसही देईल. मग तो रणबीरकडे जातो आणि म्हणतो, हा तुमच्या पिढीतील सर्वात मोठा स्टार आहे, 'रणबीर सिंग'. मग रोहित शर्मा म्हणतो - तो सिंग नाही, तो कपूर आहे. आता हे ऐकल्यानंतर रणबीरही रागावतो आणि हात जोडून तिथून निघून जातो. तो हार्दिक पांड्याकडे जातो आणि म्हणतो, मी त्याला सलमान म्हणू का? यानंतर, दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होतो.

भांडण चांगलेच रंगलेय

या जाहिरातीत आमिर आणि रणबीरचे भांडण चांगलेच रंगलेले दिसत आहे. एकमेकांच्या चित्रपटांची नावे जसे की गजनी, अ‍ॅनिमल आणि प्रसिद्ध संवादांचा उल्लेख या जाहिरातीत करण्यात आला आहे. ते दोघेही अरबाज खानपर्यंत पोहोचतात. या जाहिरातीत जॅकी श्रॉफ, आर. अश्विनसह अनेक क्रिकेटपटू आणि अभिनेते यांची उपस्थिती आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनवलेली ही जाहिरात इतकी मजेदार दिसते की वापरकर्ते प्रभावित होतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+