धक्कादायक! गोड आवाजासाठी ‘ही' प्रसिद्ध गायिका पिते सापाचे ‘स्पर्म कॉकटेल!' व्हिडिओही आला समोर
Snake sperm cocktail : भारतात आजवर गोड, मधूर आवाजाच्या अनेक गायीका झाल्या आणि आहेत, ज्या आपल्या स्वरांनी रसिकांच्या मनावर राज करतात. होय..दिग्गज गायिकांयची लाईनच लागेल. मधूर आवाज खराब होऊ नये म्हणून अनेक गायक , गायिका स्वःतहून काळजी घेतात, पण मधुर आवाजासाठी कुणी स्पर्म काॅकटेल पीत असेल तर... आणि त्यातल्या त्यात ते सापाचे स्पर्म असतील तर.. धक्का बसलाय ना हे ऐकून, होय ही गोष्ट खुद्द या गायिकेनेच सांगितली आहे.
आवाज जपण्यासाठी अनेक जण ना - ना क्लृप्त्या वापरतात. कुणी आयस्क्रीम किंवा थंड खाणे टाळतात तर कुणी आंबट खाणेही टाळतात या गोष्टी योग्य आहेतच पण या प्रसिद्ध गायिकेने आवाज जपण्यासाठी जे काही केले ते ऐकून नवल नाही पण डाके गरगरायला लागेल. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे ही गोष्ट उजेडात आली आहे.

Photo Credit - Jessica Simpson Instagram account
कोण आहे ती गायिका?
प्रसिद्ध अमेरिकन गायिका जेसिका सिम्पसन ही तिचा आवाज जपण्यासाठी एक ड्रिंक पिते. जेसिका 44 वर्षांची गोड गळ्याची गायिका आहे. 'स्वीट किसेस' आणि 'इन द स्किन' ही तिची गाणी प्रसिद्ध.. या गायिकेने दावा केला आहे की, तिला तिच्या गोड आवाज जपण्यासाठी चिनी हर्बल कॉकटेल प्यायचे आहे.
video credit - Jessica Simpson Instagram account
गायिकेने शेअर केला व्हिडीओ
चिनी हर्बल कॉकटेलमध्ये सापाचे स्पर्म्स असतात असे ती याविषयी बोलताना ती म्हणाली. 'ही हर्बल ड्रिंक मला वोकल कोचने माहिती दिली.' जेसिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चिनी हर्बल ड्रिंकविषयी खुलासा केला आहे. या ड्रिंकमध्ये सापाचे स्पर्म असल्याचे तिने सांगितले आहे.
चाहते अव्वाक्
व्हिडीओमध्ये जेसिका बोलताना दिसते आणि म्हणतेय की, हर्बल ड्रिंकमध्ये सापाचे स्पर्म्स मिसळलेले असतात, यासंदर्भातही तिला फारशी माहिती नव्हती. पण जेव्हा तिच्या एका मैत्रिणीनं तिला त्यातील घटकांची यादी दाखवली, तेव्हा तिलाही धक्का बसला. गायिकेनं केलेलं वक्तव्य आणि शेअर केलेला व्हिडीओ पाहून तिचे चाहते आवाक झाले आहेत.
काॅकटेल पिण्याच्या सल्ल्यावर काय म्हणतेय गायिका?
जेसिका व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे की, 'मला एकदा कुणीतरी विचारलं होतं की मी काय पित आहे? त्यावर मी उत्तर दिले की, हे एखाद्या औषधी वनस्पतीसारखं काही तरी आहे. माझ्या व्होकल कोचनं मला हे पेय पिण्याचा सल्ला दिला. या पेयामध्ये सापाचे स्पर्म्स असतात. जर तुला उत्तम वोकल हवं असेल तर, तुम्हाला सापाचे स्पर्म्स प्यावे लागतील. हे पेय मधासारखे गोड लागते.'












Click it and Unblock the Notifications