'मी त्याच्यासोबत एक रात्र घालवायला तयार, सर्व...'; अभिनेत्री अमिषा पटेलचा 'या' हिरोबाबत गौप्यस्फोट!
Ameesha Patel News : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिने नुकताच एका मुलाखतीदरम्यान तिच्या मनातील एक इच्छा व्यक्त केली आहे. हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझ याच्याबद्दल तिला प्रचंड आकर्षण असून, संधी मिळाल्यास त्याच्यासोबत वन-नाईट स्टँडसाठी ती आपली सर्व तत्त्वे आणि मूल्ये सोडायला तयार असल्याचे तिने सांगितले. रणवीर अलाबादिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अमिषा पटेलने टॉम क्रूझबद्दलच्या तिच्या भावना मोकळेपणाने मांडल्या.

ती म्हणाली, "मला टॉम क्रूझवर खूप प्रेम आहे. जर तुम्ही त्याच्यासोबत पॉडकास्ट केला, तर मलाही आमंत्रित करा. मी नेहमीच टॉम क्रूझची चाहती आहे.
ती पुढे म्हणाली की, माझा पेन्सिल बॉक्स, माझ्या फाइल्स आणि माझ्या खोलीतील एकमेव पोस्टर नेहमीच त्याचे राहिले आहे. तो नेहमीच माझा क्रश राहिला आहे. मी नेहमीच विनोदाने म्हणते की मी त्याच्यासाठी माझी तत्त्वे सोडून देईन. जर तुम्ही मला विचारले की मी त्याच्यासोबत वन-नाईट स्टँड करू शकते का, तर हो, मी नक्कीच करेन.
ये रहा वीडियो pic.twitter.com/hbcLDyEGTz
— खुरचेंप (@khurchemp) September 27, 2025
अमिषाने टॉम क्रूझबद्दलची आवड व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२३ मध्येही तिने त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. एका रेड कार्पेट कार्यक्रमात, टॉम क्रूझसोबत चित्रपट केलेल्या अभिनेत्रीची जागा घेण्याची आपल्याला इच्छा असल्याचे तिने सांगितले होते.
लग्नाबद्दल अमिषा काय म्हणाली?
याच पॉडकास्टमध्ये अमिषाने तिच्या लग्नाच्या आणि प्रेम जीवनाबद्दलही चर्चा केली. ती म्हणाली की, जर तिला योग्य व्यक्ती भेटला, तर ती लग्नासाठी तयार आहे.
"जो व्यक्ती मला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढू शकेल आणि माझ्या हृदयाला स्पर्श करू शकेल, तो माझा जीवनसाथी असेल. मला अजूनही अनेक श्रीमंत कुटुंबांकडून लग्नाचे प्रस्ताव येतात," असेही तिने स्पष्ट केले.
वाचा, अमिषा पटेलची कारकीर्द
अमिषा पटेलने २००० मध्ये "कहो ना... प्यार है" या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने "बद्री" (२०००) आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या "गदर: एक प्रेम कथा" (२००१) सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले.
"हमराझ" आणि "क्या यही प्यार है" (२००२) यांसारख्या हिट चित्रपटानंतर तिच्या कारकिर्दीत चढ-उतार आले. तिने "हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड" (२००७), "भूल भुलैया" (२००७) आणि "रेस २" (२०१३) मध्ये सहाय्यक भूमिका केल्या. २०१३ नंतरच्या ब्रेकनंतर, तिने नुकताच आलेल्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या "गदर २" मधून यशस्वी पुनरागमन केले.












Click it and Unblock the Notifications