अनंत-राधिकाच्या लग्नाबद्दल आलिया कश्यप मोठं विधान, सोशल मिडीयावर होतेय जोरदार चर्चा
Anant Ambani Radhika Merchant: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. 12 जुलै रोजी दोघेही सात फेरे घेतील आणि कायमचे एक होतील. दरम्यान, अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी संगीत समारंभ आणि हळदी समारंभ पार पडला. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या खास प्रसंगी बॉलीवूडपासून ते क्रिकेट जगतातील सर्व दिग्गज स्टार्स सहभागी झाले होते. अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने या लग्नाला 'सर्कस' म्हटलं आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी पाहुण्यांची यादी मोठी आहे आणि त्यात अनेक बड्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत. मात्र आलिया कश्यपने सांगितले की, तिने या लग्नाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिला आमंत्रण असताना. 'गुप शुप विथ कश्यप' या ब्रॉडकास्ट चॅनलवर आलियाने यामागचे कारण सांगितले आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला आलियाने 'सर्कस' असं म्हटलं आहे.
आलिया कश्यपने लिहिले की, 'सध्या अंबानींचे लग्न लग्न नसून सर्कस बनले आहे. मला काही फंक्शन्ससाठी आमंत्रित केले होते, कारण ते PR करत होते (मला का विचारू नका) पण मी नकार दिला. कारण मला एखाद्याच्या लग्नासाठी स्वत: ला विकण्यापेक्षा माझाकडे थोडा जास्त आत्मसस्मान आहे. जेव्हा लोकांकडे जास्त पैसा असतो तेव्हा त्यांना त्याचे काय करावे हे माहित नसते. आता आलियाचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी दोनदा प्री-वेडिंग फंक्शन्स केले होते. गुजरातमधील जामनगर येथे लग्नाआधीचा पहिला सोहळा पार पडला ज्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. यानंतर इटली ते दक्षिण फ्रान्सपर्यंत युरोप क्रूझवर गेलो जे खूपच शानदार होता. आता या जोडप्याच्या लग्नाची सर्व फंक्शन्स मुंबईत होत आहेत. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.












Click it and Unblock the Notifications