'अभिषेक कुटुंबात बीझी', आराध्या-ऐश्वर्या रायला एकटे पाहून चाहते संतापले

Aishwarya Rai And Aaradhya Bachchan: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. दरम्यान ऐश्वर्या न्यूयॉर्कला सुट्टी एॅन्जाय करण्यासाठी गेली होती. आता ती आपल्या मुलीसह मायदेशात परतली आहे. ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन रात्री उशिरा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.

रात्री उशिरा आराध्या बच्चनसोबत ऐश्वर्या रायला पाहून चाहते खूप खूश झाले. मात्र, यावेळी पुन्हा अभिषेक बच्चन पत्नी आणि मुलीसोबत दिसला नाही. अशा परिस्थितीत ऐश्वर्या रायला एकटी पाहून चाहत्यांनी अभिषेकला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यासोबतच चाहत्यांनी बच्चन कुटुंबालाही घेरलं आहे.

abhishek bachchan and aishwarya rai

व्हायरल भयानी यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहते सतत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटक-याने कमेंट करत लिहिले की, 'अभिषेक बच्चन फक्त त्याच्या कुटुंबाची काळजी घेतो.' एकाने लिहिले की, 'ऐश्वर्या एवढी मोठी अभिनेत्री असूनही तिचा नवरा तिच्यासोबत नाही.' दुसऱ्या नेटक-याने लिहिले की, 'प्रत्येक वेळी आई आणि मुलगी एकत्र असतात पण अभिषेक कधीच दिसत नाही.' एकाने लिहिले की, 'अभिषेक फक्त बापू आणि अम्मासोबत राहतो.'

अलीकडेच अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक केली होती. ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. आता या अफवांनंतर ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन पहिल्यांदाच दोघी एकत्र दिसल्या. या दोघींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन स्वतंत्रपणे पोहोचले होते. अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबासह दिसला तर ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत पोहोचली. यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.

या दोघांच्या नात्यातील संबंध बिघडण्याचे कारण बच्चन कुटुंब असल्याचे बोलले जात आहे. अभिषेकने घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर या अफवांना उधाण आले. या जोडप्याने अद्याप यावर कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिलेले नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+