Border-2 मध्ये सुनिल शेट्टीचा मुलागा अहान शेट्टीची एंट्री, भैरव सिंहच्या मुलाची भूमिका साकारणार?
Border-2 : सनी देओलचा युद्धावर आधारित असलेला चित्रपट बॉर्डरचा सिक्वेल बनवला जात आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला 'बॉर्डर' हा चित्रपट आजही भारतीय प्रेक्षकांच्या आवडत्या देशभक्तीपर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील कलाकारांशी संबंधित बातम्या सातत्याने समोर येत आहेत.
अलीकडेच दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन हे दोन कलाकार या चित्रपटाच्या जोडले गेले आहेत. आता बॉलिवूडचा आण्णा सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी ही या चित्रपटात काम करणार आहे. याची माहिती स्वतः निर्मात्यांनी दिली आहे. बॉर्डर चित्रपटात सुनील शेट्टीने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
सुनिल शेट्टीने भैरव सिंहची भूमिका साकारली होती.ती त्यावेळी प्रचंड गाजली होती. याबाबत निर्मात्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये डॉयलॉग दाखवण्यात आला आहे. "जिसे पार नहीं कर पाता दुश्मन, वो तो ना कोई लकीर है, ना दीवार और ना है खाई। और क्या है ये बॉर्डर। बस एक फौजी और उसके भाई।" असं हा डॉयलॉग आहे.

बॉर्डर-2 या चित्रपटाची शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू होऊ शकते. अहानच्या डायलॉगवरून चित्रपटात त्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मिळालेल्या माहीतीनुसार बॉर्डर 2 चित्रपटाच्या निर्मात्यांला या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू करायचे आहे. सध्या टीम प्री-प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. या त्याच्या महत्वाच्या चित्रपटासाठी त्यांना कोणतीही कसर सोडायची नाही. अशा परिस्थितीत शूटिंग सुरू करण्यापूर्वी सर्व तयारी करायची आहे. जेणेकरुन निर्मात्यांना चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सिनेमॅटिक अनुभव देता येईल. त्यांना बॉर्डर 2 हा सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा युद्धपट बनवायचा आहे.
#AhanShetty joins the #Border 2 battalion, ready to honor the legacy of our fauji heroes! 🇮🇳🔥@iamsunnydeol @Varun_dvn @diljitdosanjh @TSeries @JPFilmsOfficial #BhushanKumar #JPDutta @RealNidhiDutta @anshulchobeydop #KrishanKumar @SinghAnurag79 @binoygandhi @sumitaroraa… pic.twitter.com/elgtfwPGmM
— T-Series (@TSeries) October 3, 2024
बॉर्डर 2 ची कथा काय असेल याबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बॉर्डर 2 हा पहिल्या भागाचा सिक्वेल नसणार आहे. 'बॉर्डर 2' मध्ये अहानच्या एंन्ट्रीची घोषणा करणारा व्हिडिओमूळे चित्रपटातील सुनील शेट्टीच्या व्यक्तिरेखाच्या चित्रांनी सुरू होतो. 'बॉर्डर'मध्ये सुनील शेट्टीने बीएसएफ असिस्टंट कमांडर भैरव सिंहची भूमिका साकारली होती.आता 'बॉर्डर 2' च्या स्टोरीवरुन असा अंदाज लावला जातोय की, अहान भैरव सिंहच्या मुलाची भूमिका साकारू शकतो. दरम्यान चित्रपटाच्या कथेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.












Click it and Unblock the Notifications