Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सैफवरील हल्ल्यानंतर चौघांची चौकशी सुरु? मोबाईल केले जप्त, वाचा आत्ताची सर्वात मोठी अपडेट

बॅालीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास सैफवर चाकूहल्ला झाला. आता या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असून, सदगुरु अपार्टमेंटमधील सैफच्या चार कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Attack on Saif Ali Khan

नेमके काय झाले?

सैफ अली खान व करिना कपूर हे वांद्रे येथील सदगुरु अपार्टमेंटध्ये बाराव्या मजल्यावर राहतात. काल रात्री उशीरा सैफ अली खानच्या घरी अज्ञाताने प्रवेश केला. त्याच्या मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप केला तेव्हा, त्या व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला. त्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चोर रात्रभर घरातच?

पोलिसांनी या परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. मात्र सैफच्या अपार्टमेंटमध्ये व इतर कोठेही कुणीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर हा त्याच्या घरात रात्रभर दबा धरुन बसलाय की त्याच्याच घरातील एखाद्या कर्मचाऱ्याने हल्ला केला, हे प्रश्न सध्या पोलिसांसमोर आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्री सैफच्या घरात असणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत.

मोलकरणीशी वाद काय?

या हल्लेखोराने सुरुवातीला मोलकरणीशी वाद घातल्याचे सांगितले गेले. मोलकरणीशी वादाचा आवाज ऐकूण सैफ बाहेर आला. त्यानंतरच त्याच्यावर हल्ला झाला. त्यामुळे हा हल्लेखोर या महिलेशी संबंधीत होता का? या महिलेशी काय वाद झाला? चोरी करणारा व्यक्ती वाद कसा घालेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्या मोलकरणीचीही चौकशी सुरु असल्याचे सांगितले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+