Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शाहरुख खान 'मन्नत' सोडणार, दरमहा एवढे भाडे देऊन दुसरीकडे राहणार, का घेतला एवढा मोठा निर्णय?

Shahrukh Khan will leave Mannat Bungalow : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्याचा बंगला 'मन्नत' बाहेर तासनतास वाट पाहतात. पण आता चाहते त्याला भेटू शकणार नाहीत. खरंतर, शाहरुख खान तब्बल 25 वर्षानंतर 'मन्नत' सोडत आहे. तसेच तो त्याच्या कुटुंबासह भाड्याच्या घरात शिफ्ट होणार आहे.

शाहरुख खानने खूप मेहनत घेऊन त्याचा बंगला मन्नत सजवला होता. त्याची संपूर्ण रचना त्यांची पत्नी गौरी खान यांनी केली आहे. जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर शाहरुखच्या या बंगल्याची किंमत 200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक ते पाहण्यासाठी येतात. परंतु, आता या ठिकाणी चाहत्यांना शाहरुख खान दिसणार नाही. सद्या तो आता भाड्याने पैसे देऊन दुसरीकडे राहायला जाणार आहे. त्याचे कारण देखील समोर आले आहे.

Shahrukh khan

नुतनीकरणाला किती वेळ लागणार?

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या घरात पुढील दोन महिने नूतनीकरणाचे काम सुरू राहील. पण त्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब वांद्रे येथील पाली हिल येथे स्थलांतरित होत आहे, जिथे त्यांनी चित्रपट निर्माते वाशु भगनानी यांनी डिझाइन केलेले चार मजले आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे.

गेल्या आठवड्यात, शाहरुखची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटने भगनानीचा अभिनेता मुलगा जॅकी भगनानी आणि त्याची मुलगी दीपशिखा देशमुख यांच्यासोबत भाडेपट्टा आणि परवाना करार केला, ज्यांच्याकडे या मालमत्तेची मालकी आहे. 14 फेब्रुवारी रोजी या दोन्ही अपार्टमेंटसाठी 'रजा आणि परवाना करार' करण्यात आला.

दरमहा 24 लाखांचे भाडे द्यावे लागणार!

एका सूत्राने सांगितले की, "प्रत्येक मजल्यावर एक फ्लॅट आहे आणि तो मन्नतइतका मोठा नाही पण शाहरुख खानच्या सुरक्षा आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी जागा आहे." या फ्लॅटसाठी शाहरुख खानला चार मजल्यांसाठी दरमहा 24 लाख रुपये भाडे द्यावे लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने दोन्ही आलिशान डुप्लेक्स पुढील 3 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतले आहेत. मन्नतप्रमाणेच या बंगल्यातही शाहरुख खानच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाईल.

शाहरुख खानच्या घरात कोण कोण आहे?

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ विवाहीत असलेले शाहरुख व गौरी हे तीन सुंदर मुलांचे पालक आहेत. आर्यन, सुहाना आणि अबराम या तिघांसोबतच शाहरुख खान आणि गौरी खान आनंदी आयुष्य जगत आहेत. परंतु, सद्या घराचे नुकतीकरण करायचे असल्याने त्यांना भाड्याने घर करून राहावे लागणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+