शिल्पा शेट्टीचा बिझनेसमन पती राज कुंद्रा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक, जाणून घ्या सर्व काही
Raj Kundra Net Worth: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा बिझनेसमन पती राज कुंद्राबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकल्याचे वृत्त आहे
दरम्यान यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 च्या तरतुदींनुसार बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्यात बिझनेसमॅन राज कुंद्राची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली होती.

उद्योगपती राज कुंद्रा यांची एकूण संपत्ती
उद्योगपती राज कुंद्रा करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. एकदा शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी राज कुंद्रा म्हणाले होते की, सलमान खान एका चित्रपटातून जेवढी कमाई करतो तेवढी कमाई एका महिन्यात करतो.
कोट्यवधींमध्ये आहे राज कुंद्राची कमाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि त्यांची कमाई कोट्यवधींमध्ये आहे. त्यांची एकूण संपत्ती 2400 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राज कुंद्राचे पालकांनी मोठ्या कष्टाने पालनपोषण केले. जेव्हा ते 18 वर्षांचा झाले तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यांना एकतर त्याचे रेस्टॉरंट चालवण्यास सांगितले किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास सांगितले होते.
राज कुंद्राला करायचा होता हिऱ्यांचा व्यवसाय
वडिलांचा सल्ला गांभीर्याने घेत राज कुंद्राने आपला व्यवसाय सुरू केला. राज कुंद्राने एका मुलाखतीत सांगितले होते की, पहिल्यांदा खिशात काही पैसे घेऊन दुबईला गेलो होतो. तिथल्या हिरे व्यापाऱ्यांची भेट घेतली पण तिथे पुढे काही घडले नाही.
राज कुंद्रा दर महिन्याला 100 कोटी रुपये कमावतात
राज कुंद्रा यांच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातील सुमारे 10 कंपन्या आहेत. राज कुंद्रा हे मुंबईतील फॅशन इंडस्ट्री, रिअल इस्टेट, बांधकाम, स्टील प्लांट, फॉरेक्स इन्व्हेस्टमेंट, सत्ययुग गोल्ड, सुपर फाईट लीग आणि फूड चेन यासारख्या कामांशी संबंधित आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज कुंद्रा प्रत्येक महिन्याला जवळपास 100 कोटी रुपये कमावतात. अशा परिस्थितीत त्याची एका वर्षातील कमाई 1200 कोटी रुपये आहे, जी कोणत्याही बॉलिवूड सुपरस्टारपेक्षा जास्त आहे.












Click it and Unblock the Notifications