रश्मिका आणि विजय कधी लग्न करणार ? सलमान खानने सर्वांसमोर उघड केले गुपित, ऐकून अभिनेत्री लाजली
Rashmika Mandanna Vijay Devarakonda: साऊथ आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये ती पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
रश्मिका मंदानाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या तिच्या अफेअरमुळे अनेकदा चर्चेत असते. जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. दरम्यान दोघांपैकी कोणीही या नात्याची पुष्टी केलेली नाही. आता सिकंदर चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमान खानने असे काही सांगितले, ज्यानंतर रश्मिका आणि विजयच्या लग्नाबद्दल अटकळ बांधली जात आहे.

सलमान खान ज्या ज्या चित्रपटांमध्ये काम करतो त्यातील बहुतेक अभिनेत्री त्याच्यापेक्षा वयाने लहान असतात. आता सिकंदर चित्रपटातील सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्या वयाच्या फरकाबद्दल सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना उत्तर देताना सलमान म्हणाला की, हे मीडियाचे लोक सांगत राहतात की माझ्या आणि अभिनेत्रीच्या वयात 31 वर्षांचा फरक आहे. जर त्या अभिनेत्रीला काही अडचण नसेल, तिच्या वडिलांना काही अडचण नसेल तर तुम्हाला काय अडचण आहे?
सलमान खानने रश्मिका मंदानाच्या लग्नाबद्दल पुढे म्हणाला की,'आता जेव्हा रश्मिका मंदानाचे लग्न होईल तेव्हा तिला मुले होतील.' ती मोठी स्टार होतील, कामही करेल, बरोबर ना? मी आईची परवानगी घेईन, बरोबर? यानंतर रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. मीडियासमोर अभिनेत्री लाजताना दिसली.
आता सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्यातील सुरू असलेल्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा हे जोडपे एकत्र दिसायचे तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल अटकळ बांधली जात असे. मात्र या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केलेले नाही.
सिकंदर चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 30 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने गेल्या वर्षी 2024 मध्येच या चित्रपटाची घोषणा केली होती. आता 'सिकंदर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. सिकंदर कमाईच्या बाबतीत चमत्कार करू शकतो की नाही हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications