अभिनेता वरुण धवनने केली वरुण चक्रवर्तीचे कौतुक; म्हणाला- भावा तू लय भारी बॉल मारला, BCCI ला....
ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जोरदार धडक मारली. वर्ल्डकप फायनल २०२३ चा वचपा काढत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या चारी मुंड्या चीत केल्या.
मंगळवारी झालेल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन ट्रॅव्हिस हेडची विकेट सगळ्यात महत्त्वाची ठरली. गोलंदाज वरुण चक्रवर्तीने हेडला त्याच्या बॉलमध्ये अडवकले अन् त्याला पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. आता, वरुणने हेडची विकेट घेतल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशवासियांनी त्याचे कौतुक केले.

अशातच दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला. त्याचे कारण देखील खास आहे. वरुण धवनच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या. "थँक्यू वरुण भाई...ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतल्याबद्दल...", "चांगली बॉलिंग वरुण भाई", "आणखी एक विकेट क्या बात है", "बीसीसीआय वरुण धवनला टीम इंडियाचा कॅप्टन बनवा", अशा अनेक कमेंट वरुण धवनच्या पोस्टवर पडल्या. या सर्व कमेंट्सला अभिनेत्याने रिप्लायही दिला आहे. मात्र एका कमेंटला वरुण धवनने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्रिकेट गली ऑफिशियल या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वरुणच्या पोस्टवर "तू वर्ल्डकप फायनल खेळायला हवा होतास", अशी कमेंट केली आहे. त्यावर अभिनेत्याने मजेशीर रिप्लाय दिला आहे. "BCCI ला सांगायला हवं होतं...मला गल्ली क्रिकेटचा 35 वर्षांचा अनुभव आहे", असं उत्तर वरुण धवनने दिलं आहे. वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही काही कमेंट आणि मीम्स शेअर केले आहेत.












Click it and Unblock the Notifications