ये ढाई किलो का हाथ जब पडता है ना... सनी देओलला खरोखर आला राग? नेमकं झालं काय? पहा व्हिडीओ
चित्रपटात रागीट भूमिका करणारा अभिनेता सनी देओल मात्र त्याच्या वैयक्तीक आयुष्यात खूप शांत दिसतो. आत्तापर्यंत कोणत्याही अभिनेत्याशी किंवा सहकाऱ्याशी त्याचा वाद झाल्याच्या बातम्या आल्या नाहीत. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात मात्र सनी देओलला थोडा राग आलेला दिसला. आता हा राग त्याच्या कृतीतून दिसला नाही. कारण त्याने चेहऱ्यावर हासू दाखवत राग गिळल्याचे बोलले गेले. नेमका काय प्रकार होता? तेच आपण पाहू...

मुंबई घडला किस्सा
सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या आठवड्यात तो थिएटरमध्ये दाखल झाला. गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळल्या आहेत. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवरही बरी कमाई केली आहे. याच चित्रपटाचे विशेष प्रदर्शन नुकतेच मुंबईत ठेवण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात सनी देओलला राग येईल, असा संवाद घडला.
Is Sunny Deol angry on Shalini Bhanot?#SunnyDeol #ShalinBhanot pic.twitter.com/jwvG4nqSyP
— crystal (@swapna_majji) April 11, 2025
नेमके काय झाले?
मुंबईती विशेष चित्रपट प्रदर्शनाला अनेक प्रसिद्ध कलाकार पोहोचले होते. या कार्यक्रमाला बिग बॉस फेम अभिनेता शालीन भनोट देखील उपस्थित होता. प्रीमियर दरम्यान त्याने सनी देओलशी संवाद साधला. व्हिडिओमध्ये सनी आणि शालीन बोलत असल्याचे दिसत आहे. सनी देओलला बघून शालीन म्हणाला की, इतके वयस्कर असूनही... तुमच्यात खूप ऊर्जा आहे... खूप आवडली. यावर उत्तर देताना सनी म्हणाली, 'मी म्हातारा झालो नाही.'
सनीने राग लपवला?
शालिनच्या या प्रश्नावर मी म्हातारा झालेलो नाही, असं उत्तर सनी देओलने दिलं. मात्र तो रागावलेला दिसला नाही. शालिननेही त्याला पडलेला प्रश्न पुन्हा व्यवस्थित बोलून दाखवला. मात्र सनीने त्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.
'जाट'कडून सनीला अपेक्षा
सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तीन दिवसांत २६.५० कोटींची कमाई केली. येत्या काळात चित्रपटाची कमाई आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, 'जाट' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट फ्लॉप झाला. त्याची कमाई आता लाखोंपर्यंत मर्यादित झाली आहे.












Click it and Unblock the Notifications