सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, घराच्या खिडक्या बुलेटप्रूफ काचेच्या, हायटेक कॅमे-यांची असणार नजर
Salman Khan Security: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यापासून त्याच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. सलमान खानने काही दिवसापुर्वीच बुलेटप्रूफ कार खरेदी केली होती. आता मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याच्या घराला बुलेटप्रूफ काच आणि इलेक्ट्रिक फेन्सिंग आणि हायटेक कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत.
सलमान खानच्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानच्या घराला काही कामगार भाग निळ्या रंगाच्या बुलेटप्रूफ काच लावताना दिसत आहेत. अलीकडेच सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दिकी याची हत्या झाल्यानंतर त्यांच्या सुरेक्षासाठी शासनाकडून ही कडक पावलं उचली जात आहेत.

व्हिडिओमध्ये काही कामगार सलमानच्या घराबाहेर निळ्या रंगाचे बुलेटप्रूफ काच लावताना दिसत आहेत. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर हे काच पूर्णपणे बुलेटप्रुफ असल्याचे बोलले जात आहे. याव्यतिरिक्त, सलमानला वाय-प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्याच्या कारसोबत एक पोलिस वाहन आहे. सर्व प्रकारची शस्त्रे हाताळणारे सुरक्षा रक्षक अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी नेहमीच तैनात असतात.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून आणि त्याच्या साथीदारांकडून अनेकदा धमक्या आल्या आहेत. तसेच सलमान खानचे वडील सलीम खान यांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या घरासमोर हवेत गोळीबार करुन हल्लेखोर नंतर ते पळून गेले.
सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सलमान टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉसच्या 18 व्या सीझनसाठी चर्चेत आहे. तो त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाचे शूटिंग करत आहे, जो 2025 च्या ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.












Click it and Unblock the Notifications