दिवंगत अभिनेते इरफान खानचा मुलगा बाबिलचा व्हिडिओ व्हायरल; बॉलिवूड इंडस्ट्रीवर केले गंभीर आरोप
Babil Khan Calls on Ananya Panday So Rude : दिवंगत सुपरस्टार इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ज्यामध्ये तो चित्रपटसृष्टीत एकटे पडल्याबद्दल बोलताना दिसत आहे. त्या व्हिडिओत ढसाढसा रडत असल्याचे दिसून येत आहे. त्याने काही कलाकारांची नावे घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच बॉलिवूड अतिशय वाईट असल्याचा दावा त्याने व्हिडिओमध्ये केला.
काय म्हणाला अभिनेता बाबिल खान!
इंन्स्टाग्रामवरील पोस्टवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, बॉलिवूड खूप वाईट आहे, बॉलीवूड खूप असभ्य आहे. शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजित सिंग यांची नावे घेत त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला खूप वाईट असल्याचे म्हटले आहे.

इंन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता व्हिडिओ!
रेडिटवर शेअर केलेला हा व्हिडिओ, बाबिलने तो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, तो व्हिडिओ आता हटविण्यात आला आहे. तथापि, या व्हिडिओची वनइंडिया मराठी अजिबात पुष्टी करत नाही. परंतु, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
युझर्सकडून दिल्या जात आहे प्रतिक्रिया!
इंन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओनंतर आता युझर्सकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे. त्यात त्याने लिहिले की, हे खरोखरच दुःखद घटना आहे. तो खूप त्रास सहन करू लागला आहे. दुसऱ्या एका युझर्सने लिहिले की, त्याच्यासोबत काहीतरी घडलं आहे. तो वडिलांशिवाय अतिशय स्पर्धेच्या वातावरणात तरुण आणि असुरक्षित आहे. तो लवकरच यातून बाहेर पडेल.
अनन्या पांडेची एक पोस्टही व्हायरल!
एकीकडे बाबिल खानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर दुसरीकडे, अनन्या पांडेची एक गुढ पोस्ट सोशल मीडियावर समोर आली आहे. ज्या पोस्टमध्ये तिने तिच्या अलीकडील आयुष्यातील काही आठवणी इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. ज्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, जे येणार आहे ते येईल आणि जेव्हा ते येईल तेव्हा आपण त्याचा सामना करू. अशातच, अनन्याची ती पोस्ट लोक आता बाबील खानच्या व्हिडिओशी जोडू लागली आहेत.












Click it and Unblock the Notifications