Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! 3 इडियट्समधील प्रोफेसरचे निधन! सैन्य दल ते बॉलिवूड मराठी सिनेसृष्टी अनोखा प्रवास, वाचा

Actor Achyut Potdar passes away : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. '3 इडियट्स'मधील प्राध्यापकाच्या संस्मरणीय भूमिकेपासून ते 'लगे रहो मुन्ना भाई' आणि 'परिणीता' सारख्या चित्रपटांपर्यंत, त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर अविट छाप सोडली होती.

Actor Achyut Potdar passes away

18 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'वनइंडिया हिंदी'च्या वृत्तानुसार, ते काही काळ आजारी होते आणि त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता ठाण्यात त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

तीन दिवसांवर होता वाढदिवस

अच्युत पोतदार यांचा जन्म 22 ऑगस्टला झाला होता, त्यांचा अवघ्या तीन दिवसांवरच वाढदिवस होता, या वाढदिवसाच्या तीन दिवसआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूबद्दल हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या चाहत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय सैन्य दल ते मराठी हिंदी सिनेसृष्टी असा त्यांचा अनोखा प्रवास होता.

सैन्यदलात होते कॅप्टन

अच्युत पोतदार यांचे आयुष्य एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी नव्हते. अभिनयाकडे वळण्यापूर्वी ते भारतीय सैन्यात कॅप्टन होते आणि रेवा येथे प्राध्यापक देखील होते. त्यानंतर त्यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये २५ वर्षे काम केले. निवृत्तीनंतरच त्यांनी अभिनयाच्या जगात प्रवेश केला आणि रंगभूमीपासून सुरुवात केली.

अच्युत पोतदार - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

जन्म आणि शिक्षण: पोतदार यांचा जन्म 22 ऑगस्ट 1934 रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे बालपण इंदूर, मध्य प्रदेश येथे गेले. 1961 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी मिळवून विद्यापीठाचे पदक जिंकले.

कारकिर्द- शिक्षक आणि सैनिक: शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मध्य प्रदेशातील रेवा येथे प्राध्यापक झाले. त्यानंतर ते भारतीय सैन्यात भरती झाले आणि 1967 मध्ये कॅप्टन म्हणून निवृत्त झाले.

इंडियन ऑइलमध्ये कार्यकारी अधिकारी : सैन्यातून निवृत्तीनंतर त्यांनी सुमारे 25 वर्षे 'इंडियन ऑइल'मध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आणि 1992 मध्ये, 58 व्या वर्षी निवृत्त झाले.

कला क्षेत्रातील प्रवास: 'इंडियन ऑइल'मध्ये काम करत असतानाही ते नाट्य कार्यक्रमांमध्ये आणि नाटकांमध्ये भाग घेत होते.

अभिनय क्षेत्रातील कारकीर्द:

पोतदार 44 व्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात आले आणि त्यांनी आपल्या चरित्र भूमिकांसाठी बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली. सैन्य आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभव असूनही त्यांनी अभिनयाला एक गंभीर छंद म्हणून स्वीकारले. त्यांनी कधीही कोणाकडे काम मागितले नाही, तर जे काम मिळाले ते त्यांनी केले. दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका जवळपास निश्चित मानली जाते.

प्रमुख भूमिका:

चित्रपट: त्यांचे अलीकडचे चित्रपट 'दबंग 2', 'फेरारी की सवारी' आणि '3 इडियट्स' आहेत.

टीव्ही मालिका: त्यांनी सोनी एंटरटेनमेंटवरील 'अमिता का अमित' या मालिकेतही काम केले आहे. याशिवाय, त्यांनी 'प्रधान मंत्री' या टीव्ही मालिकेत जयप्रकाश नारायण आणि 'आज तक'च्या 'आंदोलन'मध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+