सैफवर हल्ला प्रकरण: सीसीटीव्ही दिसणारा माझा मुलगा नाहीच; आरोपीच्या वडीलांच्या दाव्याने ट्विस्ट
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास याला अटक केली. त्याने गुन्हा कबूल करुन, त्याच्या बोटांचे ठसे जुळल्याचाही दावा करण्यात आला. मात्र आता मोहम्मद शहजादच्या वडिलांच्या दाव्याने या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आला आहे. सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी हा माझा मुलगा नाही. त्याला अडकविण्यात येत आहे, असा दावा त्यांनी केला.

वडिलांचा दावा काय?
आरोपीचे वडील रुहुल अमीन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पोलिसांवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी आणि माझा मुलगा यात अजिबात साम्य नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे केस लांब आहेत. मात्र माझा मुलगा कधीच लांब केस ठेवत नाही. शरीफुलचा सहसा आर्मी कटच असतो, असा दावा त्याच्या वडीलांनी केला.
पोलिसांचा दावा काय?
सैफवर हल्ला करणारा शरीफुलच आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. सैफ अली खानच्या घरातून पोलिसांना आढळलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळत आहेत. सैफ अली खानच्या ११ व्या मजल्यावरील अपार्टमेंमध्ये चढण्यासाठी आरोपीने वापरलेल्या डक्ट पाईपवरही ठसे आढळले आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आरोपीच्या वडिलांच्या दावा खोटा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी काढली हिस्ट्री
शरीफुल हा मे महिन्यात बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आला. मेघालयात प्रवेश केल्यानंतर त्याने एका दलालाला दहा हजार दिले. त्या दलालाने त्याला आसामपर्यंत आणले आणि त्याला एक सिम कार्डही पुरवले. त्याच दलालाने त्याला कोलकात्याला जाण्यासाठी बसमध्ये बसवले. कोलकात्यात तीन दिवस राहिल्यानंतर आरोपीने मुंबईत येण्यासाठी रेल्वे पकडली.
मुंबईत पबमध्ये नोकरी
मुंबईत शरीफुल याने पुढील तीन दिवस इकडे तिकडे भटकून काढले. त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडे यांच्याशी झाली. पांडे याने त्याला वरळीतील एका पबमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात काही दिवसांतच चोरीच्या आरोपाखाली त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर तो चोऱ्या करू लागला. चोरी करण्यासाठीच तो सैफच्या घरात घुसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.












Click it and Unblock the Notifications