'बघता-बघता किती मोठी झालीय आराध्या', बच्चन कुटूंबाच्या फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडीपैकी एक असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन आहेत. मागील एक वर्षापासून ही जोडी घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान या दोघांनाही नेहमीच एकत्र येऊन या अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले आहे. अलिकडेच दोघांचे काही फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत. हे जोडपे अलिकडेच पुण्यात ऐश्वर्याच्या चुलत भावाच्या लग्नाला उपस्थित राहिले होते, ज्यामुळे घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा एकदा पूर्णविराम मिळाला. लग्नात त्यांची मुलगी आराध्या देखील उपस्थित होती. आता आराध्या देशीलूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

लग्नाच्या कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन खूपच सुंदर दिसत होती. तिने पिंक रंगाचा ड्रेस घातला होता. तिचे मोकळे केस आणि कमीत कमी मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत होते. आराध्या बच्चननेही हाताने भरतकाम केलेला पांढरा अनारकली ड्रेस घातला होता आणि तिच्या पालकांसोबतच्या फोटोमध्ये ती हसताना दिसत आहे. आता इतक्या दिवसांनी या जोडप्याला एकत्र पाहून चाहते खूप आनंदी झाले.
चाहते पोस्टवर कमेंट करून खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ पाहून यूजर्स म्हणत आहेत की बघता-बघता आराध्या किती मोठी झाली आहे. लोकांनी स्टार किडचे कौतुक केले आहे. काही जण म्हणतात की आराध्या पूर्णपणे बदलली आहे. ती तिच्या आईसारखीच सुंदर दिसत आहे.
मागील वर्षी ऐश्वर्या आणि अभिषेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात स्वतंत्रपणे पोहोचले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना वेग आला. लग्नानंतर ऐश्वर्या राय बहुतेकदा आराध्यासोबत दिसली. ज्यामुळे लोकांनी अभिषेकला ट्रोल करायला सुरुवात केली. दरम्यान नंतर दोघेही एकत्र आले आणि या अफवांना पूर्णविराम दिला.
या जोडीच्या आगामी प्रोजेक्ट बोलायचं झालं तर ऐश्वर्या राय बच्चनने कोणत्याही नवीन प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. दरम्यान, अभिषेक बच्चन अलीकडेच 'बी हॅपी' मध्ये दिसला. जर रिपोर्टवर विश्वास ठेवला तर त्याने शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात अभिषेक खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल. तसेच निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.












Click it and Unblock the Notifications