70th Filmfare Awards : फिल्मफेअर पुरस्कारात 'या' चित्रपटाची बाजी! कुणाला मिळाले पुरस्कार? वाचा यादी
70th Filmfare Awards 2025 Full Winners List in marathi : ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे शानदार उद्घाटन आज अहमदाबादमध्ये झाले आहे. या खास सोहळ्यासाठी बॉलिवूडचे तमाम दिग्गज एकाच छताखाली एकत्र आले आहेत. दरवर्षीप्रमाणे, सुपरस्टार शाहरुख खानने या सोहळ्याचे होस्टिंग (यजमानपद) यशस्वीपणे सांभाळले आहे. दमदार परफॉर्मन्स, हास्यविनोद आणि पुरस्कारांच्या वर्षावाने ही संध्याकाळ अधिकच खास बनली आहे.
या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे 'किल' (Kill) या चित्रपटावर अनेक तांत्रिक पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. या रंगारंग सोहळ्यातील पुरस्कार विजेत्यांची संपुर्ण यादी जाणून घेऊया.

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
१. सर्वोत्कृष्ट संपादन (Best Editing)
विजेते: शिवकुमार व्ही. पणिक्कर
चित्रपट: किल (Kill)
२. सर्वोत्कृष्ट कथा (Best Story)
विजेते: आदित्य धर
चित्रपट: आर्टिकल ३७० (Article 370)
३. सर्वोत्कृष्ट ॲक्शन (Best Action)
विजेते: सीयंग ओह आणि परवेज शेख
चित्रपट: किल (Kill)
४. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (Best Cinematography)
विजेते: रफी महमूद
चित्रपट: किल (Kill)
५. सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन (Best Sound Design)
विजेते: सुभाष साहू
चित्रपट: किल (Kill)
६. सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट (Best Visual Effect)
विजेते: रेड फाइन
चित्रपट: मुंज्या (Munjya)
७. सर्वोत्कृष्ट संवाद-पटकथा (Best Dialogue-Screenplay)
विजेते: स्नेहा देसाई
चित्रपट: लापता लेडीज (Laapataa Ladies)
८. सर्वोत्कृष्ट वेशभूषा (Best Costume)
विजेते: दर्शन जलान
चित्रपट: लापता लेडीज (Laapataa Ladies)
९. सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक (Best Debut Director)
विजेते: कुणाल खेमू
चित्रपट: मंडगांव एक्सप्रेस (Madgaon Express)
रेड कार्पेटवर चमकले सितारे, शाहरुख खानचे डॅशिंग होस्टिंग
सलग १७ वर्षांपासून फिल्मफेअर होस्ट करणाऱ्या शाहरुख खानच्या डॅशिंग लूकने यावेळीही चाहत्यांची मनं जिंकली. तो ब्लॅक सूटमध्ये अत्यंत आकर्षक दिसत होता, तर करण जोहरने पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये हजेरी लावली.
अनन्या पांडेचा परफॉर्मन्स लय भारी!
अभिनेत्री अनन्या पांडेचा परफॉर्मन्सचा व्हिडिओ समोर आला आहे. ती पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये 'मन मोहिनी तेरी अदा' या गाण्यावर सुंदर नृत्य करताना दिसली.
कृती सेननचा आकर्षक लूक!
कृती सेननने हिरव्या रंगाचा बॉडीकॉन गाऊन परिधान केला होता, जो या अवॉर्ड नाइटसाठी अगदी परफेक्ट दिसत होता. तिने तिच्या लूकने रेड कार्पेटवर चाहत्यांचे लक्ष वेधले. कृती यावेळी परफॉर्मन्स करेल अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.












Click it and Unblock the Notifications