Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

48 वर्षीय बॉलीवूड अभिनेत्याने केले 22 वर्षीय गर्लफ्रेंडशी लग्न! बुर्ज खलिफात पार पडला लग्न सोहळा

Bollywood actor Sahil Khan married with Milena Alexandra : 'एक्सक्यूज मी' चित्रपटातून प्रसिद्धीस आलेल्या बॉलीवूड अभिनेता साहिल खानने दुसरे लग्न केले आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त दुबईतील बुर्ज खलिफा येथे त्याने लग्नाची दुसरी गाठ बांधली. विशेष बाब म्हणजे साहिल खान पेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंड मिलेना अलेक्झांड्रासोबत त्याने लग्न केले आहे. या लग्नाचे त्याने फोटे देखील सोशल मीडियावर शेअर केले.

साहिल खानने त्याच्या इंस्टाग्रामवर या भव्य लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये त्याची वधू मिलेना केकसोबत पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने लिहिले, "शेवटी लग्न झाले." तुमच्या अभिनंदन आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. माझ्या सर्व प्रियजनांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. सर्वांना आयुष्यात प्रेम, आनंद आणि यश मिळो.

Sahil Khan married with  Milena Alexandra

कोण आहे मिलेना अलेक्झांड्रा?

साहिल खान हा 48 वर्षांचा आहे. तर मिलेना 22 वर्षांची आहे. साहिल पेक्षा तिचे वय 26 वर्षांनी लहान आहे. एका माध्यमाशी संवाद साधताना साहिल म्हणाला होता की, मिलेना हुशार आहे. तसेच ती अतिसंवेदनशील देखील आहे. कारण ते खूप लहान आहेत. आमच्या वयात खूप फरक आहे. पण ती इतर 22 वर्षांच्या मुलींसारखी नाहीये. खरं तर, ती मानसिकदृष्ट्या खूप मॅच्युअरर्ड आहे.

साहिल पहिली पत्नी कोण आहे?

साहिल खानने 2004 मध्ये इराणी अभिनेत्री नेगर खानशी पहिले लग्न केले. पण त्यांचे लग्न एका वर्षापेक्षा कमी काळ टिकले आणि 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अनेक वर्ष लग्न केले नाही. तर गेल्या काही दिवसांपासून तो मिलेनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. अन् व्हॅलेटाईन डेच्या दिवशी फायनली त्यांनी लग्न केले.

साहिल बॉलिवूडमध्ये चालला नाही

स्टाईल आणि एक्सक्यूज मी सारख्या चित्रपटांमधून लोकप्रियता मिळवणारा साहिल खान कधीही इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवू शकला नाही. साहिल डबल क्लास, ये है जिंदगी आणि अलादीन सारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता. पण यातील बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले. अपयशी कारकिर्द असूनही, साहिलचा चाहता वर्ग मोठा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+