NEET PG 2025 कधी होणार? SC च्या निर्देशांनंतर आता NBEMS एकाच शिफ्टमध्ये घेणार परीक्षा, तयारी सुरु
When will NEET PG 2025 be held : राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळ- नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - पदव्युत्तर (NEET PG) 2025 पुढे ढकलली आहे. येत्या 15 जून 2025 रोजी होणार होती, पण अधिकृत घोषणेनुसार, NBEMS आता अतिरिक्त परीक्षा केंद्रे तयार करण्याचे आणि न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची तयारीवर भर देत आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - पदव्युत्तर (NEET PG) 2025 पुढे ढकलण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निर्देशांचे पालन करणे हा होय, यासाठीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरक्षित परीक्षा केंद्रे, एकाच शिफ्टमध्ये परिक्षेची तयारी
निर्देशानुसार, राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाने नीट पीजी परिक्षेसाठी संपूर्ण पारदर्शकता आणि देशभरातील सुरक्षित परीक्षा केंद्रे सुनिश्चित करुन एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे आवश्यक आहे, यामुळे आता मंडळ अशी तयारी करत आहे.
याचसोबत NBEMS आता अतिरिक्त परीक्षा केंद्रे शोधणे आणि तयार करण्यासाठी आणि न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करण्यासाटी एकप्रकारे आवश्यक पायाभूत सुविधा अपग्रेडेशन करत आहे.
नीट पीजी केव्हा NEET PG 2025 कधी?
NBEMS ने नीट पीजी परिक्षेसाठी अद्याप परीक्षेची कोणतीही सुधारीत तारीख जाहीर केलेली नाही. लवकरच यासंदर्भात निर्णय होईल अशी आशा आहे.
तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणासाठीची सर्वात महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या या परीक्षेची सुधारित तारखेबाबत एनबीईएमएसकडून अधिकृत अपडेट्स कधी येतील याची असंख्य विद्यार्थी वाट पाहत आहेत. या विद्यार्थ्यांनी वेळेवर सूचनांसाठी नियमितपणे अधिकृत वेबसाइट - natboard.edu.in - तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कुणी केली होती याचिका?
सात उमेदवारांनी एक याचिका दाखल केली होती. त्यात सर्व पदव्युत्तर वैद्यकीय इच्छुकांसाठी निष्पक्षता आणि एकरूपता राखण्यासाठी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली होती. या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने एनबीईएमएसला त्यांच्या परीक्षा योजनेची पुनर्रचना करण्याचे आणि पारदर्शक आणि समान मूल्यांकन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सुरक्षित, पुरेशी तयार केंद्रांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता परीक्षाही पुढे ढकलली असून एनबीईएमएस तयारी करत आहे.












Click it and Unblock the Notifications