दहावी, बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी कोणती प्रमाणपत्रे हवी? ते काढण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, वाचा
What documents are required for further admission after 10th and 12th : बारावी आणि दहावीचा निकाल लागला असून बोर्डाकडून गुणपत्रक वितरीत केले जात आहे. आता दहावी, बारावीनंतर पुढे काय हा प्रश्न अनेकांसमोर आहे. प्रत्येकजण आपापल्या नियोजनाप्रमाणे प्रवेशप्रक्रीयेसाठी तयारी करत आहेत. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. निकाल लागल्यानंतर जूनमध्ये तहसीलचे विविध दाखले काढण्याकरिता वेळेवर धावपळ करण्यापेक्षा आत्ताच आपल्या पाल्यांचे कागदपत्रे तयार करून ठेवावी असा सल्ला दिला जातो ते महत्वाचेच आहे.
बारावी आणि दहावीनंतर अनेक कोर्सेस आहेत ज्यासाठी सवलत, शिष्यवृत्ती आणि इतर प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते, शिवाय दहावीनंतर रहिवासी प्रमाणपत्रांपासून जातप्रमाणपत्र काढणे तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रासाठीही अनेक कागदपत्रे लागतात अशावेळी ही सर्व कागदपत्रे आपल्याजवळ वेळेआधी असणे आवश्यक आहे. आज आपण दहावी, बारावीसाठी कोणती प्रमाणपत्रे लागतात आणि ती काढण्यासाठी काय कागदपत्रे लागतात हे जाणून घेऊया.

ज्या पाल्यांनी इयत्ता 10 वी, 11 वी, 12 वी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष, पदवी, पदव्युत्तर पदविका परीक्षा दिली असेल किंवा इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे काढून घ्यावीत.
हि कागदपत्रे तयार ठेवावी.
शिक्षण, प्रवेशासाठी कोण-कोणती कागदपत्रं लागतात
1.उत्पन्न प्रमाणपत्र
2.रहिवाशी प्रमाणपत्र
3. वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
4. जातीचे प्रमाणपत्र
5. नॉन-क्रिमीलेअर
6. EWS प्रमाणपत्र
7. SEBC प्रमाणपत्र
टीप - ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी काही कागदपत्र (अपवाद वगळता) केवळ एक असले तरीही पुरेसे ठरते.
1. उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रं
मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हरचा परवाना किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे पत्ता पुरावा मानला जाणारा कोणताही अधिकृत दस्तऐवज. पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र. अर्जदार/कुटुंब प्रमुखाकडून स्व-घोषणापत्रावर स्वाक्षरी केलेली असावी.
2. रहिवासी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
जन्म प्रमाणपत्र. निवास प्रमाणपत्र (जुन्या प्रत, असल्यास), शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र. ओळखीचा पुरावा उदा मतदार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट प्रत, आधार कार्ड इ (कोणतेही एक) [स्वत: साक्षांकित]
3. वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे काय लागतात
पॅन कार्ड, पासपोर्ट, आरएसबीवाय कार्, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, अर्जदाराचा फोटो, अर्जदाराची स्वाक्षरी, सरकारी किंवा निमसरकारी संस्थांनी दिलेले ओळखपत्र
4. जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
ओळख पुरावा
पॅन कार्ड, पासपोर्ट, आरएसबीवाय कार्, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, अर्जदाराचा फोटो, सरकारी किंवा निमसरकारी संस्थांनी दिलेले ओळखपत्र
पत्त्याच्या पुराव्यासाठी..
पासपोर्ट, पाणी बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, मालमत्ता कर पावती, 7/12 आणि 8 अ/भाडे पावतीचे उतारे (यापैकी एक)
5. नाॅन क्रिमिलिअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
पॅन कार्ड, पासपोर्ट, आरएसबीवाय कार्ड, पाणी बिल, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, अर्जदाराचा फोटो, मालमत्ता कर पावती, सरकारी किंवा निमसरकारी संस्थांनी दिलेले ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा (किमान -1)
पासपोर्ट, पाणी बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, मालमत्ता कर पावती, 7/12 आणि 8 अ/भाडे पावतीचे उतारे
6. EWS प्रमाणपत्रासाठी काय कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड, ओळखीचा पुरावा (मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, इतरांसह), अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मालमत्तेची कागदपत्रे/जमिनीची कागदपत्रे, बँक स्टेटमेंट, प्रतिज्ञापत्र/स्व-घोषणा
7. SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी काय कागदपत्रे लागतात?
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- रहिवासाचा पुरावा
- शाळा सोडल्याचा दाखला
- रक्तातील दोन नातेवाईकांचे टी.सी. किंवा निरक्षर असल्याचे शपथपत्र तसेच आधार कार्ड/मतदान कार्ड
- दहावी किंवा बारावी गुणपत्रक (स्पेलिंगसाठी)
- वंशावळ (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास पालकांचा फोटो)
- वडिलांचा 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या 'मराठा' अशी जात नमूद असलेला शाळेचा दाखला किंवा मराठा जात प्रमाणपत्र
- वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध नसल्यास कुटुंबातील 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या 'मराठा' अशी जात नमूद असलेला शाळेचा दाखला
- मराठा उल्लेख असलेले जन्म-मृत्यू नोंदीचा महसूल अभिलेखातील उतारा
- सरकारी नोकरदाराच्या सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील जातीची नोंद अथवा समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जात प्रमाणपत्र.
- मराठा असा उल्लेख असलेला इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील शाळा सोडल्याची टीसी
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ!







Click it and Unblock the Notifications