Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

SSC CGL 2025 : सरकारी नोकरीची संधी! कर्मचारी निवड आयोगाची नोंदणी सुरू, ssc.gov.in द्वारे करा अर्ज

SSC CGL 2025 : सरकारी नोकरी कुणाला नकोय,जो तो सरकारी नोकरीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. अशातच आता स्पर्धा परिक्षेची तयारी करुन नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) परीक्षा 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. दरवर्षी लाखो उमेदवार या भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवतात,आता ही संधी दारात आली आहे.

SSC CGL 2025

एसएससी सीजीएल परिक्षेनंतर कुठे केल्या जातात नियोक्त्या

एसएससी सीजीएल परिक्षेत यशस्वी ठरणाऱ्यांना भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये गट 'ब' आणि 'क' पदांवर नियुक्त्या केल्या जातात. यावर्षी ही परीक्षा 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

आजपासून नोंदणी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय?

सदर परिक्षेसाठी आजपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर अधिसूचनेसोबतच, आयोगाने हे देखील स्पष्ट केले आहे की, फॉर्म भरण्यात चूक झाल्यास उमेदवार दोनदा दुरुस्त्या करू शकतात. आज, म्हणजेच 9 जून 2025 पासून, अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै निश्चित करण्यात आली आहे.

परीक्षा ऑगस्टमध्ये होणार

आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, SSC CGL 2025 परीक्षा 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान घेतली जाईल. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात असेल.

SSC CGL अर्ज कसा करायचा

SSC CGL 2025 मध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार खाली दिलेल्या सोप्या टप्प्याच्या मदतीने फॉर्म भरू शकतात.

  • सर्वप्रथम SSC वेबसाइट ssc.gov.in ला भेट द्या.
  • होमपेजवरील "नवीन युजर/नोंदणी करा" लिंकवर क्लिक करा.
  • नाव, संपर्क क्रमांक, ईमेल, शिक्षण तपशील इत्यादी तुमची वैयक्तिक माहिती भरून OTR (एक वेळ नोंदणी) पूर्ण करा. नोंदणीनंतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • आता संपूर्ण अर्ज फॉर्म काळजीपुर्वक नीट भरा.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  • भरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
  • ₹ 100 अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने सबमिट करा.
  • फॉर्मचा प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.

फॉर्म दुरुस्त करण्याची दोनवेळा संधी

जर उमेदवाराने फॉर्म भरताना काही चूक केली तर तो फॉर्म दोनदा बदलू शकतो. पहिल्यांदाच दुरुस्ती शुल्क ₹ 200 आणि दुसऱ्यांदा ₹ 500 निश्चित करण्यात आले आहे. यावेळी अनेक पदांसाठी रिक्त जागा SSC CGL 2025 च्या अधिसूचनेत, अनेक पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा आणि पात्रता निकष पूर्णपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो.

'या' तारखा आणि गोष्टी लक्षात ठेवा

अर्ज नोंदणी : 9 जून 2025 पासून सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जुलै 2025
परीक्षेची तारीख : 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाइट : ssc.gov.in
डाउनलोड सूचना : वेबसाइटवर उपलब्ध उमेदवारांना शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि शक्य तितक्या लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+