Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

RBI Recruitment 2025 : आरबीआयमध्ये नोकरीची संधी! ग्रेड बी अधिकारी पदांच्या एवढ्या जागा, वाचा डिटेल्स

RBI Recruitment 2025 Grade B Officer 120 vacancies : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी तसेच स्पर्धा परिक्षा आणि बँकिंग परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही मोठी संधी दिली असून पदभरतीही जाहीर केली आहे. त्यामुळे नोकरी ज्यांना हवी त्यांच्यासाठी ही अमुल्य संधी सोडता कामा नये.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अधिकारी ग्रेड बी (Officer Grade B) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित नोकरींपैकी एक संधी आहे. या वर्षी, आरबीआयने एकूण १२० रिक्त पदांसाठी अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी केली आहे. जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

RBI Recruitment 2025

रिक्त पदे किती?

आरबीआयने या भरती प्रक्रियेत ग्रेड बी अधिकारी पदांसाठी तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये जागा उपलब्ध केल्या आहेत त्या कोणत्या हे आपण जाणून घेऊया.

  • ऑफिसर ग्रेड बी (जनरल): ८३ पदे
  • ऑफिसर ग्रेड बी (DEPR): १७ पदे
  • ऑफिसर ग्रेड बी (DSIM): २० पदे

या पदांसाठीची निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. इच्छुक उमेदवार १८ आणि १९ ऑक्टोबर, २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता ऑफिसर ग्रेड बी (जनरल): कोणत्याही शाखेतील पदवी (बॅचलर डिग्री), ज्यात किमान ६०% गुण (SC/ST/दिव्यांग उमेदवारांसाठी ५५%) आवश्यक आहेत.

ऑफिसर ग्रेड बी (DEPR):

अर्थशास्त्र किंवा वित्त (इकोनॉमिक्स/फायनान्स) मध्ये पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन) किंवा PGDM/MBA ची पदवी असणे आवश्यक आहे.

ऑफिसर ग्रेड बी (DSIM):

सांख्यिकी (Statistics) किंवा गणित (Mathematics) मध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क किती?

वयाची अट : उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. आरक्षित श्रेणीतील (SC/ST/OBC) उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

अर्ज शुल्क एवढे : सामान्य (General), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ₹८५० शुल्क आहे, तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी हे शुल्क ₹१०० आहे.

अर्जासाठी काय प्रक्रिया करायची?

अर्ज फक्त आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in वर ऑनलाइन भरता येईल. उमेदवारांनी नोंदणी करून आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज आणि शुल्क भरल्यानंतर, त्याची प्रिंट काढणे महत्त्वाचे आहे.

या भरतीमुळे अनेक तरुणांना आरबीआयमध्ये करिअर करण्याची संधी मिळणार आहे, जिथे चांगल्या पगारासोबतच कामाची स्थिरता आणि प्रतिष्ठा मिळते.

हेही वाचा : Indian Navy : इंडियन नेव्हीत नोकरीची मोठी संधी! 286 पदं, पगारही चांगला, कुणीही करा अर्ज, फी नाही

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+