Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

LIC Recruitment : एलआयसीमध्ये 841 पदांसाठी बंपर भरती! पगारही मोठ्ठा,अर्जासाठी अंतीम तारीख जाणून घ्या

LIC Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. एलआयसीमध्ये तब्बल ८४१ पदांसाठी बंपर भरती होत आहे. या पदांसाठी पगारही चांगला असून पटापट अर्ज करुन तरुण आणि बेरोजगारांसाठी ही चांगली संधी आहे.

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता (AE) या पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

LIC Recruitment 2025

भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी आणि विश्वसनिय कंपनी आहे, सरकारच्या मालकीची ही कंपनी लोकांच्या हितासाठी झटते. आता या एलआयीसमध्ये एएओ आणि एई पदांसाठी ८४१ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

८४१ पदांसाठी भरती

या पदांसाठी एवढ्या जागा

  • सहाय्यक अभियंता (AE): ८१ पदे
  • सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (विशेषज्ञ) (AAO): ४१० पदे
  • सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (सामान्यज्ञ) (AAO): ३५० पदे

महत्त्वाच्या तारखा आणि शुल्क

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ८ सप्टेंबर २०२५

परिक्षेसाठी अर्ज शुल्क किती आहे?

  • SC/ST/दिव्यांग उमेदवार: ₹८५ + व्यवहार शुल्क + GST
  • इतर सर्व श्रेणींसाठी: ₹७०० + व्यवहार शुल्क + GST

कशी होणार निवड प्रक्रिया?

तीन टप्प्यांमध्ये निवड: AAO पदांसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत घेतली जाईल:

१. प्राथमिक परीक्षा (Prelims): ही परीक्षा केवळ पात्रता स्वरूपाची असेल. यातील गुण अंतिम निवड यादीत जोडले जाणार नाहीत.

२. मुख्य परीक्षा (Mains): अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित असेल.

३. मुलाखत (Interview): मुख्य परीक्षेनंतर मुलाखत घेतली जाईल.

अंतिम निवड: मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतील एकूण गुणांच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल. यानंतर वैद्यकीय तपासणीही केली जाईल.

पात्रता आणि अटींबाबत वेबसाईटवर डिटेल्स माहिती

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेच्या अटी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली संपूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

हेही वाचा : SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 541 जागांसाठी पदभरती होणार, आजपासून भरा अर्ज, अंतीम तारीख कधी? वाचा

हेही वाचा : तरुणांना देशसेवेची संधी! BSF मध्ये 4,700 हून अधिक पदांची मोठी भरती! अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+