तरुणांना देशसेवेची संधी! BSF मध्ये 4,700 हून अधिक पदांची मोठी भरती! अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Bsf Recruitment 2025 : देशसेवा करण्याची अनोखी संधी तरुणांसाठी दारात आली आहे. पोलिस भरतीची तयारी करणारे तरुणही या संधीचा लाभ घेऊ शकतात. सीमा सुरक्षा दलाने (BSF) 4,700 हून अधिक पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ही केवळ एक नोकरी नसून, आपल्या देशाची सेवा करण्याची आणि सीमेवर देशाचे रक्षण करण्याची एक अभिमानास्पद संधी आहे.

साडेचार हजारांवर असलेल्या या भरतीमध्ये दोन प्रमुख पदांचा समावेश आहे, यामध्ये हेडहेड कॉन्स्टेबल (Head Constable), कॉन्स्टेबल ट्रेड्समन (Constable Tradesman), हेड कॉन्स्टेबल भरती (रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक) या पदांसाठी एकूण 1,121 जागा उपलब्ध आहेत, ज्यांचे विभाजन खालीलप्रमाणे आहे.
- रेडिओ ऑपरेटर: 910 पदे
- रेडिओ मेकॅनिक: 211 पदे
आवश्यक पात्रता:
रेडिओ ऑपरेटर: उमेदवाराने 12 वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा 10 वी नंतर रेडिओ किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये 2 वर्षांचा ITI कोर्स केलेला असावा.
रेडिओ मेकॅनिक: उमेदवाराने 10 वी नंतर ITI कोर्स केलेला असावा किंवा 12 वी (PCM) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 सप्टेंबर 2025
निवड प्रक्रिया:
- लिखित परीक्षा
- शारीरिक क्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मापन चाचणी (PST)
- कागदपत्र तपासणी (Document Verification)
- वैद्यकीय तपासणी (Medical Test)
कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती
या पदांसाठी एकूण 3,588 जागा उपलब्ध आहेत, ज्यात पुरुष आणि महिला दोघांसाठीही पदे आहेत:
पुरुष: 3,406 पदे
महिला: 182 पदे (कुक, टेलर, वॉशरमन, स्वीपर आणि इतर तांत्रिक पदांसाठी)
आवश्यक पात्रता:
उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असावा. काही विशिष्ट पदांसाठी ITI किंवा NSQF प्रशिक्षण आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 25/26 जुलै 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23/25 ऑगस्ट 2025
निवड प्रक्रिया:
- शारीरिक क्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मापन चाचणी (PST)
- लिखित परीक्षा
- ट्रेड टेस्ट
- कागदपत्र तपासणी
- वैद्यकीय तपासणी
अर्ज कुठे करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट bsf.gov.in ला भेट देऊन या भरतीबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकतात आणि अर्ज करू शकतात.












Click it and Unblock the Notifications