Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नेव्हीत मोठी भरती! एवढ्या पदासांठी आहे संधी, एक लाखांवर पगार
Indian Navy Recruitment 2025 : स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे देशभक्ती आणि अर्थाजन या दोन्ही दृष्टीने भारतीय नौसेनेने 260 पदांसाठी मोठी भरती काढली आहे, ज्या तरुणांना नेव्हीचा ड्रेस घालून भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करायचे आहे आणि यानिमित्ताने देशसेवा करायची आहे, त्यांनी ही संधी चुकवू नये अशी आहे.

कशी होणार पात्र उमेदवारांची निवड?
वन इंडिया हिंदीच्या वृत्तानुसार भारतीय नौसेनेमध्ये शॉर्ट सर्विस कमिशन एसएससीच्या माध्यमातून नौसेना अधिकाऱ्यांची मोठी भरती काढण्यात आली आहे. भारतीय नौसेनेतील या भरतीमध्ये टेक्निकल, एज्युकेशन, एक्झिक्युटिव्ह ब्रँचमध्ये पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे, चांगला पगार, करिअरसह देशसेवा आणि मातृभूमीचे ऋण फेडण्याची ही चांगली संधी आहे.
कधीपासून होणार अर्ज सुरु?
प्राप्ती माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांसाठी 9 ऑगस्ट 2025 म्हणजेच परवापासून अर्ज प्रक्रिया करता येणार आहे. यादरम्यान उमेदवार नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर आपले अर्ज दाखल करू शकतात. एक सप्टेंबर 2025 पर्यंत हे अर्ज उमेदवाराला दाखल करता येणार आहे.
260 पदांसाठी भरती
नौसेनेच्या भरती प्रक्रियेमध्ये एक्झिक्युटिव्ह, एज्युकेशन आणि टेक्निकल ब्रँच अशा जवळजवळ 260 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारांची निवड,शाॅर्टलिस्टिंग, इंटरव्यू आणि वैद्यकीय चाचणी आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रानुसार करण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता काय?
या पदांसाठी बी. कॉम, एमएससी, MCA पोस्ट ग्रॅज्यूएशन पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. लाॅ, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी. आणि सप्लाय चेनमधील उमेदवारही पात्र मानले जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्यांचा जन्म 2 जुलै 2001 ते 1 जुलै 2007 यादरम्यान असावा अशी ही अट घालण्यात आली आहे.
किती आहे पगार?
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सर्वात आधी ट्रेनिंग दिली जाईल, त्यानंतर भारतीय नौदलामध्ये सहभागी करून घेतले जाईल. या निवड झालेल्या नोकरदारांना सुरुवातीला एक लाख दहा हजार रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे. पायलट आणि ऑब्झर्वर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर 31 हजार 250 रुपये अतिरिक्त भत्ता मिळणार आहे. यासह अन्य सहकारी सुविधाही आणि भत्ताही दिला जातो.
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करताना, सर्व कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करणे आवश्यक राहील.
भरती प्रक्रियेत ही आहेत पदे
- कार्यकारी शाखा - ५७ पदे पायलट - २४ पदे
- निरीक्षक - २० पदे
- एटीसी (हवाई वाहतूक नियंत्रण) - २० पदे
- लॉजिस्टिक्स - १० पदे
- शिक्षण शाखा - १५ पदे
- अभियांत्रिकी शाखा - ३६ पदे
- इलेक्ट्रॉनिक शाखा - ४० पदे
- नौदल बांधकाम व्यावसायिक - १६ पदे












Click it and Unblock the Notifications