सरकारी नोकरी करायचीय? 'या' कंपनीत मोठी संधी, फक्त मुलाखत परिक्षा नाही! 4 दिवसच राहीले, लवकर अर्ज करा
ECIL Recruitment 2025 : सरकारी सेवेत काम करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते पण कुणाची ती पुर्ण होते तर बहुतांशजणांची ती पुर्ण होतेच असे नाही, मग सरकारी सेवा नसेल तर सरकारी कंपनीही म्हणा पण आहे ना सरकारीच..म्हणूनच जर तुम्हाला सरकारी कंपनीत नोकरी करायची असेल तर मोठी संधी चालून आली आहे.

कोणत्या सरकारी कंपनीत आहे नोकरीची संधी
इलेक्ट्राॅनिक्स काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या कंपनीत टेक्निकल ऑफिसर म्हणजेच तांत्रिक अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी आहे.
कधीपर्यंत करता येणार अर्ज
इलेक्ट्राॅनिक्स काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या कंपनीत तांत्रिक अधिकारी पदासाठी २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
या पदासाठी पात्रता काय आहे...
तांत्रिक अधिकारी पदांसाठी कंपनीत नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे अभियांत्रिकीची पदवी असावी. बीई, बीटेकची पदवी असल्यास तुम्हाला येथे अर्ज करता येणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे ECE/ETC/E&C/ELECTRONICS/Electrical/ Mechanical Degree प्राप्त उमेदवार असावा. यासोबतच एक वर्ष अॅप्रेंटिसशिप केलेली असावी. या पदभरतीसाठी ३० वर्षाच्या आतील उमेदवार अर्ज करु शकतो.
परीक्षा द्यावी लागेल का?
तांत्रिक अधिकारी पदासाठी तुम्हाला कोणत्याही परिक्षेची गरज नाही. तुम्हाला अर्ज करावा लागेल. तुम्ही शाॅर्टलिस्ट झाला तर तुम्हाला मुलाखत द्यावी लागेल, तुमची निवड याच आधारावर आणि कामाच्या अनुभवावर होईल. या पदासाठी तुम्हाला २८ हजार रुपये प्रति मासिक वेतन मिळेल, असे साम टीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.
हेही वाचा : IOCL मध्ये बंपर भरती! परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरीची संधी! 537 पदं, 'या' तारखेच्या आत करा अर्ज
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- तांत्रिक अधिकारी पदासाठी तुम्हाला सरकारी कंपनीच्या www.ecil.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला या कंपनीच्या www.ecil.in या वेबसाईटवर लाॅग इन करावे लागेल.
- यानंतर जाॅब पनिंग या सेक्शनवर जा
- तिथे तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे.
- माहिती भरल्यानंतर फोटो आणि सही मागितल्यानुसार अपलोड करायची आहे.
- यानंतर रजिस्ट्रेशन शुल्क भरुन तुम्हाला अर्जप्रक्रीया पुर्ण करायची आहे. पुढील आवश्यकतेनुसार, तुम्हाला प्रिंटही काढता येईल.












Click it and Unblock the Notifications