DRDO DMRL Apprentice Recruitment : आयटीआय तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी! परिक्षा नाही, पगारही बक्कळ
DRDO DMRL Apprentice Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. भारतीय संरक्षण संशोधन विकास संस्थेत करीअर करण्याची संधी आहे. ही सरकारी नोकरी खास असून यामध्ये तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही मुलाखत देऊन सरकारी सेवेत जाता येणार आहे.
तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली नोकरी असून सरकारी संस्थेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (DRDO) ही संधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. DRDO च्या डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने ITI पास तरुणांसाठी अप्रेंटिसच्या ८० जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

या भरतीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय केवळ त्यांच्या गुणांवर आधारित केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमांनुसार चांगला स्टायपेंड (मानधन) देखील मिळेल.
किती पदांसाठी भरती (DRDO DMRL Apprentice Recruitment 2025)
प्राप्त माहितीनुसार, अप्रेंटिसच्या ८० जागांसाठी भरती जाहीर केली आहे.
पदांचे नाव: अप्रेंटिस
ट्रेडनुसार पदांची संख्या:
- वेल्डर २
- टर्नर ५
- मशिनिस्ट १०
- फिटर १२
- इलेक्ट्रॉनिक्स ६
- इलेक्ट्रिशियन १२
- कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) ३०
- सुतार - २
- छायाचित्रकार १
आवश्यक पात्रता काय आहे?
- उमेदवार NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण असावा.
- केवळ नियमित (Regular) उमेदवार अर्ज करू शकतात.
- ज्या उमेदवारांनी यापूर्वी अप्रेंटिसशिप कायदा १९६१ अंतर्गत प्रशिक्षण घेतले आहे, ते या भरतीसाठी पात्र नाहीत.
अशी असेल निवड प्रक्रिया आणि वयोमर्यादा किती?
निवड: येथे कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.
वयोमर्यादा: अप्रेंटिसशिप कायद्यानुसार वयोमर्यादा निश्चित केली जाईल.
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा?
अधिकृत वेबसाइट : apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या.
- "डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी" (Defence Metallurgical Research Laboratory) च्या एस्टॅब्लिशमेंट विभागात (Establishment Section) जा.
- अर्ज लिंकवर क्लिक करून नोंदणी करा.
- लॉग इन करून फॉर्म भरा आणि सबमिट करा.
- अर्ज पूर्ण झाल्यावर त्याची प्रिंटआउट घेऊन ठेवा.
या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
अर्ज सुरू होण्याची तारीख: ९ ऑगस्ट २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० ऑगस्ट २०२५
तुम्ही या भरतीसाठी पात्र असल्यास, वेळेआधीच अर्ज करून या संधीचा फायदा घ्या.
हेही वाचा : SSC recruitment 2025: नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुड न्यूज! परीक्षा नाही, थेट नोकरीची संधी; पगारही 40 हजार












Click it and Unblock the Notifications