SSC recruitment 2025: नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुड न्यूज! परीक्षा नाही, थेट नोकरीची संधी; पगारही 40 हजार

SSC recruitment 2025 : स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोगात नोकरीची मोठी संधी असून खास बाब म्हणजे या पदभरतीत परीक्षा देण्याची गरज नाही तर पात्रता आणि मुलखातीच्या आधारावर थेट नोकरी मिळणार आहे.

SSC recruitment 2025

कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे ही भरती प्रक्रीया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणतीही लेखी नाही. त्यामुळे फक्त मुलाखतीवर फोकस करुन तुम्ही नोकरी मिळवू शकता. एससीने यंग प्रोफेशनल्सच्या ५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत मात्र, वेतन किती आहे आणि अर्ज करण्याची अंतीम तारीख काय आहे हे जाणून घेऊया.

अर्ज करण्याची अंतिम तारीख किती

एसएससीने यंग प्रोफेशनल्सच्या ५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, २० ऑगस्ट २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळेल आणि त्यांच्या कामाच्या कामगिरीनुसार त्यांचा करार पुढे वाढवला जाईल.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी.

वयोमर्यादा: किमान २१ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे (आरक्षित वर्गासाठी नियमांनुसार सूट).

वेतन आणि कामाच्या अटी

  • निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा ₹४०,००० पगार मिळेल.
  • कामाची कामगिरी समाधानकारक असल्यास, हा करार एका वर्षासाठी वाढवला जाईल.
  • पगारात जास्तीत जास्त ५% पर्यंत वाढ होऊ शकते.
  • कमाल वेतन सुरुवातीच्या वेतनाच्या १.२५ पट असू शकते.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, जेणेकरून पात्रता आणि अटी-शर्तींची संपूर्ण माहिती मिळेल.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+