CBSE Result 2025: आता 10वी, 12वीच्या विद्यार्थांना ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासता येणार, घ्या जाणून
CBSE Result 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी, 12वी परीक्षेचा निकाल पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Cbse) दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थांना त्यांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासता येणार आहेत. उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर सीबीएसईकडून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
दरम्यान परीक्षेचा निकाल पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कमी गुण मिळाल्याची तक्रार करणारे विद्यार्थी आता त्यांचे गुण पाहू शकतील. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल. जेणेकरून त्यांना विषयनिहाय उत्तरपत्रिकांचे गुण पाहता येणार आहेत. लिंक उघडल्यानंतर फक्त पाच दिवसांसाठी ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागेल आणि प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विद्यार्थी परीक्षकांनी दिलेले गुण तपासू शकतील.

विद्यार्थी उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी देखील घेऊ शकतात
विद्यार्थ्यांना जर त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी हवी असेल तर ते काढू शकतात. यासाठी विद्यार्थ्याला निर्धारित शुल्कासह अर्ज करावा लागेल. या प्रक्रियेनंतर बोर्डाकडून उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी दिली जाईल. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळेल.
10 वी 12 वीच्या विद्यार्थांना होणार फायदा
उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 700 रुपये आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. कमी गुण मिळाल्याबद्दल तक्रार करणाऱ्या उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने सीबीएसईने हे पाऊल उचलले आहे. आता बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी उत्तरनिहाय गुण पाहू शकणार आहेत..












Click it and Unblock the Notifications