बजेटमध्ये 3 वरुन 5 लाखांंची कर्जमर्यादा वाढवलेली किसान क्रेडीट कार्ड योजना काय आहे? फायदा काय? वाचा
What is Kisan Credit Card Scheme : : कोरोना लॉकडाऊन दरम्यान मोदी सरकारने 20 लाख कोटी रुपयांचे मेगा पॅकेज जाहीर केले. या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅकेजचा दुसरा हप्ता जाहीर केला होता. यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली. ती योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना होय. याद्वारे अडीच कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले गेले.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 2 लाख कोटी रुपयांपर्यंतची रक्कम वितरीत केली गेली तर कालच म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांना दिली जाणाऱ्या कर्जमर्यादेत 2 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढ केली आहे. चला तर किसान कार्डबद्दल तपशीलवार जाणून घेऊया...

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारची कल्याणकारी योजना आहे, जी 1998 मध्ये सुरू झाली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार सहज कर्ज दिले जाते. हे किसान क्रेडिट कार्ड नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे सुरू केले आहे. सध्या देशातील 6.92 कोटींवर शेतकऱ्यांकडे किसान कार्ड आहे.
किसान क्रेडिट कार्ड कसे काम करते...
किसान कार्डद्वारे शेतकऱ्यांना डेबिट कार्ड दिले जाते, ज्याच्या मदतीने ते त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. उरलेल्या पैशावर त्यांना व्याजही मिळते. मोदी सरकारने देशातील 2 लाखांवर शेतकऱ्यांना ही क्रेडिट कार्ड वितरीत केले आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी 5 वर्षात 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकत होते. आता ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. विशेष म्हणजे अवघ्या 4 टक्के दराने व्याज शेतकऱ्यांना भरावे लागते.
किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय?
या कार्डची वैधता पाच वर्षे आहे. मोदी सरकारने किसान क्रेडिट कार्ड पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडले आहे. शेतकऱ्यांनी रितसर नोंदणी आणि अर्ज केल्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना कार्ड दिले जाते. सरकार शेतकऱ्यांना कर्जाच्या रकमेवर 2 टक्के सबसिडी देते आणि हे कर्ज 7 टक्क्यांपर्यंत पोहोचते. त्याच वेळी, शेतकऱ्याने वेळेवर कर्ज परत केल्यास, त्याला 3 टक्के अतिरिक्त अनुदान मिळते. असे शेतकरी त्यांच्या शेतीसाठी केवळ 4 टक्के व्याजदराने कर्ज घेऊ शकतात.
किसान क्रेडिट कार्डसाठी काय आहे प्रक्रीया?
- शेतकरी या KCC कार्डसाठी अगदी सहजपणे अर्ज करू शकतात.
- तुम्ही https://pmkisan.gov.in/ किंवा www.argicoop.gov.in वर जाऊन किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करू शकता.
- या फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांसह ते सादर करावे लागेल.
- या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पिकाच्या तपशीलासह अनेक माहिती भरावी लागेल.
- तुम्ही दुसरे कार्ड बनवलेले नाही ना याची पडताळणी करावी लागेल.
- यासोबतच तुम्ही कोणत्याही सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँकेत जाऊनही अर्ज करू शकता.












Click it and Unblock the Notifications