Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Us fed interest Rate अमेरिकेत व्याजदर घटले; जाणून घ्या भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार की कमी होणार

Us fed interest Rate cut impact on india : अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने नुकतीच व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच मोठी घोषणा आहे. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयामुळे अमेरिकेत स्वस्ताई येईल अशी शक्यता आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठा बदल होत आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल बँकेच्या व्याजदरातील कपातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात बदल होत असतानाच भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजार, रुपया, आणि दैनंदिन जीवनातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर या कपातीचा नेमका काय परिणाम होईल, हे आपण जाणून घेऊया.

Us fed interest Rate cut impact

भारतीय शेअर बाजारावर परिणाम

अमेरिकेत व्याजदर कमी झाल्याने, परदेशी गुंतवणूकदार (FII) भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेत अधिक पैसा गुंतवण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन तेजी येऊ शकते.

काय होणार सकारात्मक प्रभाव

कमी व्याजदरांमुळे अमेरिकन गुंतवणूकदार चांगल्या परताव्यासाठी भारतात पैसे लावतील, ज्यामुळे शेअर बाजार आणि बॉन्ड मार्केटला चालना मिळेल.

काय म्हणतात तज्ज्ञ?

इक्विनॉमिक्स रिसर्चचे संस्थापक जी. चोकालिंगम यांच्या मते, केवळ ०.२५ टक्क्यांची कपात बाजाराला फारशी चालना देणार नाही. पण, जर एकूण ०.७५ ते १ टक्क्यांची कपात झाली, तर भारतीय बाजारासाठी ते खूप सकारात्मक असेल.

कोणत्या शेअर्सवर परिणाम?

तज्ज्ञांच्या माहिती नुसार, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एसबीआय, आणि बजाज फायनान्स सारख्या निवडक आयटी, बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअर्सवर या निर्णयाचा परिणाम दिसू शकतो.

रुपया मजबूत झाला तर महागाई घटेल

फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयामुळे अमेरिकन डॉलरमध्ये थोडीशी कमजोरी येऊ शकते, ज्यामुळे भारतीय रुपया मजबूत होईल. रुपया मजबूत झाल्यास, तेल, सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात स्वस्त होऊ शकते.

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग?

महागाई वाढल्यास कच्चे तेल महाग होऊ शकते. भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो, त्यामुळे जर तेलाचे भाव वाढले तर पेट्रोल-डिझेल आणि वाहतूक खर्च वाढू शकतो, ज्यामुळे महागाईला थोडी गती मिळू शकते. अमेरिकेत व्याजदर कमी झाल्यामुळे, आता भारतीय रिझर्व्ह बँकेवरही (RBI) व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढेल. जर आरबीआयने व्याजदर कमी केले, तर ते महागाई नियंत्रणात ठेवण्यास आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला मदत करू शकते.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर काय परिणाम होणार?

जर भारतात परदेशी गुंतवणूक वाढली आणि रुपया मजबूत झाला, तर मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर थोडे कमी होऊ शकतात. या निर्णयामुळे अमेरिकेत कर्ज स्वस्त होतील, ज्यामुळे भारताच्या निर्यातीवरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+