Union Budget 2026 : आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प! टॅक्समधून दिलासा मिळणार? कुठे पाहाल 'लाईव्ह'
Union Budget 2026 Live updates : देशाच्या अर्थव्यवस्थेची पुढील दिशा ठरवणारा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ (Union Budget 2026) आज, १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा ताळेबंद मांडून एक नवा विक्रम प्रस्थापित करतील. विशेष म्हणजे, गेल्या दशकात पहिल्यांदाच अर्थसंकल्प रविवारी सादर केला जात आहे, ज्यामुळे उद्योगजगतासह सामान्य नागरिकांचेही लक्ष याकडे लागून राहिले आहे.

कधी आणि कुठे पाहाल 'लाईव्ह' अपडेट्स?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी ११ वाजता सुरू होईल. तुम्ही हे भाषण खालील प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहू शकता.
टीव्ही: संसद टीव्ही (Sansad TV) आणि दूरदर्शनवर (DD News) थेट प्रक्षेपण.
ऑनलाईन: 'indiabudget.gov.in' या अधिकृत वेबसाईटवर.
सोशल मीडिया: संसद टीव्ही आणि पीआयबीच्या (PIB) यूट्यूब चॅनेलवर.
या अर्थसंकल्पाकडून ५ मोठ्या अपेक्षा
१. नोकरदारांना 'टॅक्स'मध्ये दिलासा
मध्यमवर्गीयांना 'स्टँडर्ड डिडक्शन' (Standard Deduction) ७५,००० वरून १ लाख रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
२. रोजगार आणि कौशल्य विकास
तरुणांसाठी नवीन रोजगार संधी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात.
३. शेतकरी आणि ग्रामीण विकास
शेतीसाठी पायाभूत सुविधा आणि पीएम-किसान (PM-Kisan) योजनेच्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
४. रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर
नवीन वंदे भारत ट्रेन आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या निधीची घोषणा होऊ शकते.
५. आरोग्य विमा
८०डी (Section 80D) अंतर्गत आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील कर सवलतीची मर्यादा वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.
शेअर बाजारही राहणार सुरू
साधारणपणे रविवारी शेअर बाजार बंद असतो, मात्र अर्थसंकल्पामुळे आज NSE आणि BSE हे दोन्ही शेअर बाजार सुरू राहणार आहेत. अर्थमंत्र्यांच्या घोषणांचा बाजारावर काय परिणाम होतो, याकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष असेल.
हेही वाचा : Union Budget 2026 Live Updates निर्मला सीतारमण आज मांडणार देशाचा अर्थसंकल्प; क्षणाक्षणाचे अपडेट वाचा












Click it and Unblock the Notifications