Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लोकसभा निवडणूक लढवायला पैसे नाही म्हणणाऱ्या अर्थमंत्री सीतारामन यांची संपत्ती किती जाणून घ्या

मुंबई - "माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत!" हे अर्थमंत्री सीतारामन यांचे विधान लोकसभा निवडणूक काळात चर्चेत आले होते. त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली नाही. फोर्ब्ज मासिकाच्या सशक्त महिलांच्या पहिल्या शंभर जणीत पाचवेळा स्थान पटकावणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्याकडे किती संपत्ती आहे हे जाणून घेऊया.

निवडणूक लढवण्यास दिला होता नकार

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी सातवी यादी जाहीर केली. याच दरम्यान, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ' लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत' असे सांगत निर्मला सीतारमण यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर कर्नाटकातून राज्यसभेवर त्या निवडून गेल्या.

finance minister nirmala sitharaman net-worth marathi news

..म्हणून आश्चर्याचा धक्का

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने सीतारामन यांना २०१९ मध्ये प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार मिळालेला असून त्या भारतातील सशक्त अर्थमंत्री आणि तितक्याच ताकदवान महिला नेत्या म्हणून पुढे आल्या आहेत. त्या सातव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत. पण त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत हे त्यांचे विधानाने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

सीतारामन यांनी फेटाळता होता प्रस्ताव

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र आपण तो फेटाळल्याचे सीतारमण यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, "पक्षाच्या अध्यक्षांकडून मला लोकसभा निवडणुकीच्या उमेदावारीबाबत विचारण्यात आले होते. आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवा, अशी ऑफरही देण्यात आली होती. त्याबाबत मी दहा दिवस विचार केला आणि निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला."


"देशाचा निधी माझा नाही"

निवडणूक लढवण्यासाठी ज्या प्रकारे पैसे खर्च केले जातात, तेवढे पुरेसे पैसे माझ्याकडे नाहीत. तुम्ही तर देशाच्या अर्थमंत्री आहात आणि तुम्हीच म्हणत आहात की माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असे विचारले असता देशाचा निधी हा माझा नाही. माझा पगार, सेव्हिंग माझी आहे, असे उत्तर सीतारामन यांनी दिले होते. तसेच निवडणुकीमध्ये जात किंवा धर्माचा आधार घेतला जातो, ते मला खटकतं. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी स्पष्ट नकार दिला. पक्षाध्यक्षांनीही माझ्या उत्तराशी सहमती दर्शवली असे त्या म्हणाल्या होत्या. मग बघुया सीतारामन यांची नेटवर्थ किती आहे.

सीतारामन यांच्याकडे इतकी संपत्ती

  • 'Myneta.info' नुसार, निर्मला सीतारामन यांच्याकडे 2 कोटी 50 हजार 99,396 रुपयांची संपत्ती आहे.
  • ज्यात जंगम आणि स्थावर दोन्ही मालमत्तांचा समावेश आहे.
  • निर्मला सीतारामन यांच्याकडे एकही कार नाही.
  • निर्मला सीतारामन यांच्याकडे 315 ग्रॅम सोने आणि 2 किलो चांदी आहे.
  • हैदराबादमध्ये जवळपास 16 लाख रुपयांची जमीन आहे.
  • 33 हजार 94 हजार 838 रुपयांचे कर्जही घेतले असून त्याच्याकडे शेअर्स आणि इतर गुंतवणूकही आहे.
  • सीतारामन यांच्याकडे 17 हजार 200 रुपये रोख तर 45 लाख 4 हजार 479 रुपये बँकेत शिल्लक होते.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+