Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रविवारी पैसे गुंतवा शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न! हजारो गुंतवणूकदारांना चुना! मेहनतीची कमाई गमावली

Torres Company Scam : गुंतवणुकीवर झटपट पैसे मिळवण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. बऱ्याचदा शेअरमार्केटमध्ये आणि निफ्टीत पैसे गुंतवले जातात. अशातच रविवारी पैसे गुंतवून शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न मिळवा अशी ऑफर टोरेस कंपनीने दिली होती. ती ऑफर शुद्ध फसवणूक असल्याचे स्पष्ट होत आहे. या कंपनीने गुंतवणूकदाराचे सुमारे तीन हजार कोटी रुपये गिळल्याची धक्कादायक बाब आता समोर येत आहे.

आर्थिक गुंतवणुकीवर अवघ्या सहा ते सात दिवसांत घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने हजारो मुंबईकरांना आता पश्चतापाची वेळ आली आहे. या कंपनीने आर्थिक फसवणूक केल्याची बाब सोमवारी उघड झाली. त्यानंतर टोरेस कंपनीच्या दादरसह मुंबई आणि नवी मुंबईतील कार्यालयांबाहेर मोठी गर्दी जमली होती. आता पैसे कसे परत मिळणार याचीच गुंतवणूकदारांना चिंता आहे.

Torres Company Scam

पाच जणांवर गुन्हा

फसवणूकप्रकरणी टोरेस कंपनीशी संबंधित पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार यांचा समावेश आहे.

बिझनेस माॅडेलची होती चर्चाच चर्चा

टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना मोठी आश्वासने दिली होती. त्यांचे बिझनेस मॉडेल चर्चेत येत होते आणि यामुळेच हजारो गुंतवणूकदार या बिझनेस माॅडेलकडे आकृष्ट झाले. टोरेस ही विदेशी कंपनी असून ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय करते. गेल्यावर्षी या कंपनीने मुंबईत पहिले कार्यालय सुरु केले होते. त्यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेन तयार झाली होती.

हेही वाचा : Stock market todays update : जाणून घ्या महाराष्ट्राच्या निवडणुकांदरम्यान शेअर बाजाराची स्थिती?

काय होता टोरेस कंपनीचा फंडा..

  • अवघ्या सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा ही कंपनी देत होती. अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते.
  • टोरेस कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते. मात्र, हे दागिने बनावट होते. याविषयी अनेक गुंतवणुकदारांना माहिती होती. मात्र, आपल्या गुंतवणुकीवर घसघशीत परतावा मिळत असल्याने बहुतांश गुंतवणुकदारांनी याकडे कानाडोळा केला.
  • टोरेस कंपनीत गुंतवणुकदारांना अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती.
  • ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा देत असे.
  • सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी 6 टक्के व्याज देत होती. तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदारांना 11 टक्के व्याज मिळत होते.
  • सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा देऊन गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे गुंतवणूकदारांचेही डोळे दिपले...
  • अवघ्या काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळेल, यामुळे गुंतवणुकदार निश्चिंत होते. मात्र, गेल्या आठवड्यात टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला होता.
  • 8 जानेवारीपर्यंत तुमचे पैसे परत मिळतील, असे गुंतवणुकदारांना सांगण्यात आले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दादरमधील टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणुकदारांची प्रचंड गर्दी झाली होती.
  • संतप्त गुंतवणुकदारांनी टोरेस कंपनीच्या मुंबईतील तीन कार्यालयांची तोडफोड केली. दादरमधील कार्यालयाबाहेर पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचा : अजमेरमध्ये 9 हजार किलो बनावट गूळ जप्त! खरेदीवेळी होऊ शकते फसवणूक, वाचा भेसळयुक्त गूळ खाण्याचे नुकसान

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+