Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इकडे अर्थसंकल्प सुरु अन् तिकडे दोन तासांतच सोन्याचे भाव गडगडले, 4 हजारांनी स्वस्त

मुंबई - देशात गेल्या काही महिन्यांत तब्बल 73 हजारांपर्यंत पोहोचलेले सोन्याचे भाव आज अर्थसंकल्प सुरु असतानाच गडगडले. सकाळपासून अंशतः दर कमी होत असतानाच संसदेत निर्मला सितारामण यांनी सोन्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोने स्वस्त होणार आहे दुसरी बाब की, आज सोने तब्बल 4 हजारांनी खाली आले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 23 जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

today gold rate decreased by 3000

अर्थमंत्री निर्मला सितारमण काही महत्वाच्या वस्तू स्वस्त होणार असे जाहीर केले. यात सर्वसामान्यांच्या औत्सुक्याचा विषय असलेल्या सोन्याचेही भाव कमी होणार हे स्पष्ट केले. याचा परिणाम काहीअंशी सोने-खरेदी, विक्रीवर झाला आहे. यामुळे आज सोन्याचे दर तीन हजारांनी खाली पोहचल्याचे बाजारात दिसून आले.

आज ग्राहकांचा फायदा

प्राप्त माहितीनुसार, जळगाव, पुणे आणि लखनऊच्या सराफ बाजारात याचा परिणाम दिसून आला.सोने खरेदीसाठी दुकानात गर्दी केलेल्या महिला व ग्राहकांना 2 तासांतच प्रति तोळा सोन्यामागे 4 हजार रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे, सोनं खरेदीसाठी आलेल्या या सर्वच ग्राहकांनी बजेटवर समाधान व्यक्त केले आहे.

सोने खरेदीदारांची 'चांदी'

अर्थसंकल्प जाहीर होताच 4 हजारांनी सोन्याचा दर घटले. विशेष म्हणजे अर्थसंकल्पानंतर सोने खरेदी करताना ग्राहकांची चांदी झाली असे काही व्यापारी सांगतात. तर चांदीच्या दरातही काहीअंशी घट आगामी काळात होणार असल्याचा व्यापाऱ्याचा अंदाज आहे.

सोने-चांदी सीमाशुल्कात कपात होणार

केंद्राने सादर केलेल्या अर्थ संकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीत दिसून आला. कारण, सोन्याच्या दरात अवघ्या दोन तासात 4 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सोने हा गरीब असो, वा श्रीमंत, प्रत्येकाच्या जीवनातील निगडीत घटक आहे.कुटुंब आणि सोने हे भारतीयांचे समिकरणच आहे. लग्नसराईतही सोने खरेदीसाठी झुंबड उडते. आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात घोषणा करताच सोन्याचे दर घसरले आहेत.

हे महत्वाचे बदल

  • सोने, चांदीवरील सीमा शुल्क - 6 टक्के
  • प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के
  • अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.

हे स्वस्त होणार

मासे अन्न, कर्करोग औषध, सोने चांदी, प्लॅटिनम, भ्रमणध्वनी, मोबाइल चार्जर, विद्युत तारा, एक्स-रे मशीन, सोलर सेट, लेदर आणि शूजवर कस्टम ड्युटी कमी केली आहे. तीन कॅन्सर औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+