Gold Rate Today : सोनं पुन्हा भडकलं! एका दिवसात तोळ्यामागे 'एवढ्या' रुपयांची मोठी वाढ; वाचा ताजे दर
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेल्या घसरणीनंतर आज सराफा बाजारात सोन्याने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. आज, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम तब्बल ६६० रुपयांची वाढ झाली आहे. या विक्रमी वाढीमुळे २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव १६,००० रुपयांच्या (प्रति ग्रॅम) विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि अमेरिकन डॉलरमधील चढ-उतारामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याला पुन्हा झळाळी मिळाली आहे.

आजची सोन्याची दरवाढ एका दृष्टिक्षेपात
आज बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. प्रति १० ग्रॅम (१ तोळा) मागे आज तब्बल ६,६०० रुपयांची वाढ झाली आहे.
- २४ कॅरेट (९९.९% शुद्ध): १६,०६८ रुपये प्रति ग्रॅम (१,६०,६८० रुपये प्रति १० ग्रॅम)
- २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): १४,७३० रुपये प्रति ग्रॅम (१,४७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम)
- १८ कॅरेट: १२,०५५ रुपये प्रति ग्रॅम (१,२०,५५० रुपये प्रति १० ग्रॅम)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
१. मुंबई (Mumbai)
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹१,६०,६८०
- २२ कॅरेट (दागिने): ₹१,४७,३००
२. पुणे (Pune)
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹१,६०,६८०
- २२ कॅरेट (दागिने): ₹१,४७,३००
३. नागपूर (Nagpur)
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹१,६०,७५०
- २२ कॅरेट (दागिने): ₹१,४७,३५०
४. नाशिक (Nashik)
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹१,६०,७००
- २२ कॅरेट (दागिने): ₹१,४७,३२०
(टीप: खालील दर २४ कॅरेट सोन्याचे असून यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. सराफा असोसिएशननुसार यात शहरांनुसार काही प्रमाणात तफावत असू शकते.)
सोनं महागण्याची काही कारणे
- तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरात झालेल्या या अचानक वाढीमागे खालील कारणे आहेत
- जागतिक घडामोडी: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत किमतींवर झाला आहे.
- फेडरल बँकेच्या अध्यक्षपदाची नव्या व्यक्तीकडे धुरा सोपवण्याचा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय.
- लग्नसराई: भारतात लग्नसराईचा हंगाम (Wedding Season) सुरु होत असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी प्रचंड वाढली आहे.
- सुरक्षित गुंतवणूक: डॉलरच्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे 'सेफ हेवन' (Safe Haven) म्हणून पाहत आहेत.












Click it and Unblock the Notifications