Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेत मंदीचे सावट, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 17 लाख कोटींचं नुकसान!

शेअर बाजारात मागील आठवड्यातील शुक्रवारी मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले. अमेरिकेतील मंदीच्या धसक्याने तेथील शेअर बाजारात मोठी उलथा-पालथ झाली आहे. भारतीय शेअर बाजारातही त्याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे.

शेअर बाजारात आठवड्याचा पहिलाच दिवस 'ब्लॅक मंडे' ठरताना दिसत आहे. सोमवारी, देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 2,400 अंकांच्या घसरणीसह उघडला तर निफ्टीही 500 हून अधिक अंकांनी घसरला.

slow-recession-in-america-sensex-fell-by-2400-points-investors-lost-17-lakh-crores

मार्केटचे हेवीवेट शेअर्स, एचसीएल टेक आणि टायटन 9 % हून अधिक घसरले असून या मोठ्या घसरणीमुळे काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे जवळपास 17 लाख कोटी रुपये बुडाले.

जागतिक शेअर बाजारात घसरण

जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये पडझड झाली तर, अमेरिकेत मंदीची भीती आणि मध्य-पूर्वेत वाढत्या तणावामुळेही गुंतवणूकदार धास्तावले आहेत. अशा जागतिक घडामोडींमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

त्याचवेळी, भारतीय मार्केटमध्ये सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स जवळपास तीन टक्क्यांनी घसरून 78,580.46 अंकांवर आला, तर निफ्टीदेखील जवळपास दोन टक्क्यांनी घसरून 24,277.60 अंकांवर आला. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट दिसत आहे.

काही मिनिटातच कोट्यावधीचे नुकसान

शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. एकीकडे शुक्रवारी बाजार कोसळल्याने लोकांच्या सुमारे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते, तर सोमवारी अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे सुमारे दहा लाख कोटींचे नुकसान झाले. हेवीवेट समभागांमधील मोठ्या विक्रीमुळे निफ्टीही 24,300 अंकांच्या खाली घसरला तर, या घसरणीमुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 10.24 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 446.92 लाख कोटी रुपयांवर आले.

लार्जकॅप कंपन्यांपैकी टाटा मोटर्सचे शेअर्स 4.28% घसरून रु. 1,050 वर आले, तर टेक महिंद्राचा शेअर 3.17 टक्क्यांनी घसरला आसुन टाटा स्टीलचा स्टॉकही उघडताच 3.89 टक्के घसरला आणि 150 रुपयांवर आला. याशिवाय, मिडकॅप कंपन्यांमध्ये मदरसन शेअर 7.53% कोसळला तर, एलआयसी हाऊसिंग फायनान्स शेअर 6.26%आणि भारत फोर्ग शेअर 5.44टक्क्यांनी खाली आला आहे.

दुसरीकडे, स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये न्यूक्लियस शेअर 13.28 %, ACI शेअर 7.16 टक्क्यांनी खाली ट्रेंड करत आहे. तसेच किर्लोइसकर ब्रदर्स शेअर 6.96%, तर फिनिक्स लिमिटेड शेअर 6.98 टक्क्यांनी आपटला आहे.

हे कारण देखील आहे

बँक ऑफ जपानने व्याजदरामध्ये वाढ केल्यामुळे जपानचा शेअर बाजारही घसरला आहे. त्याचवेळी हमास प्रमुखाच्या हत्येनंतर मध्यपूर्वेत तणाव वाढत असून त्यामुळे इराण आणि इजराइल मध्ये युद्धाची भीती वाढू लागली आहे. या घटकाचा जागतिक बाजारावरही परिणाम होत असून त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+