Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Silver Price Today : अबब! चांदीचे भाव टाईट; गाठला उच्चांक; एकाच दिवसात प्रतिकिलो 'एवढे' वाढले दर

Silver Price Today : एकीकडे सोने भाव खात असतानाच आता चांदीचीही दराच्या बाबतीच चांदीच होत आहे. मोठी बाब म्हणजे सणासुदीच्या पार्श्वभुमीवर चांदीचे भाव टाईट आहेत. अशातच सध्या सुरू असलेल्या नवरात्री उत्सवामुळे मौल्यवान धातूंना मागणी वाढल्याचा थेट परिणाम आज (सोमवार, २९ सप्टेंबर २०२५) चांदीच्या दरांवर दिसून आला. देशातील प्रमुख शहरांमध्ये चांदीच्या भावात लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून,मल्टी कमोडीटी एक्स्चेंजवरही चांदीने उच्चांक गाठला आहे.

तुम्हाला जर सणासुदीच्या काळात चांदी खरेदी करायची असेल तर आजचे वाढलेले दर जाणून घेणे आवश्यक आहेत आणि आगामी एक वर्षात चांदीचे भाव किती होतील याचे भाकितही तज्ज्ञांनी वर्तवले आहे हेही जाणून घेऊया.

Silver Price Today

नवरात्रीच्या सातव्या दिवशी चांदी महागली

आज २९ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्रीच्या सातव्या दिवशी चांदी झाली महाग झाली असून आज, नवरात्रीच्या सातव्या दिवशी प्रतिकिलो चांदीच्या दरात तब्बल ₹१००० ची वाढ झाली आहे.

  • परिमाण आजचे दर कालचे दर आजची वाढ (रुपयांमध्ये)
  • १ ग्रॅम १५० १४९ ₹१
  • ८ ग्रॅम १,२०० १,१९२ ₹८
  • १० ग्रॅम १,५०० १,४९० ₹१०
  • १०० ग्रॅम १५,००० १४,९०० ₹१००
  • १ किलो १,५०,००० १,४९,००० ₹१,०००

MCX वरही चांदीत तेजी

MCX वर आज सकाळी ११:४७ वाजेपर्यंत चांदीचा दर ₹१,४३,६४५ प्रति किलो इतका होता. हा दर आदल्या दिवसाच्या बंद भावापेक्षा ₹१,७५६ (१.२४%) जास्त आहे. सकारात्मक बाजार भावनांमुळे चांदीची ही तेजी कायम आहे.

पुणे, मुंबईसह विविध शहरांतील आजचे दर किती?

सणासुदीच्या काळात स्थानिक मागणीमुळे दर मुंबई, दिल्ली आणि पुणे येथे ₹१,५०,००० प्रति किलो आहेत, तर दक्षिणेकडील शहरांमध्ये (चेन्नई, हैदराबाद, केरळ) मागणी जास्त असल्याने दर ₹१,६०,००० प्रति किलो इतका उच्चांक गाठला आहे.

  • शहर १० ग्रॅम १०० ग्रॅम १ किलो
  • मुंबई, पुणे, दिल्ली, वडोदरा : ₹१,५०० ₹१५,००० ₹१,५०,०००
  • चेन्नई, हैदराबाद, केरळ : ₹१,६०० ₹१६,००० ₹१,६०,०००

पुढील काळात चांदीचे भविष्य काय?

मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, चांदीच्या दरांबाबत मध्यम ते दीर्घकाळात सकारात्मक दृष्टिकोन कायम आहे. येत्या १२ ते १५ महिन्यांच्या कालावधीत, चांदीचा दर ₹१,५०,००० प्रति किलोपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तज्ज्ञांनी बाजारात दर खाली आल्यास गुंतवणूकदारांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+