Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Share Market Crash : 28 वर्षानंतर शेअर मार्केट कोसळले, गुंतवणूकरादांचे वाटोळं, नेमकं कारण काय?

Share Market Crash : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ट्रेडिंग दिवशी (28 फेब्रुवारी) सेन्सेक्स सुमारे 1400 अंकांनी घसरला आहे. तो 73,250 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील सुमारे 400 अंकांनी घसरून 22,100 च्या पातळीवर पोहोचला.

दुसरीकडे ही घटना तब्बल 28 वर्षानंतर घडल्याने शेअर मार्केटमध्ये गोंधळ उडाला आहे. गुंतवणूकदारांचे वाटोळे झाले आहे. गुंतवणूकदारांचे करोडोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नेमकं त्यामागील कारणं काय, याची माहिती जाणून घ्या...!

बीएसई स्मॉल कॅप 1450 अंकांनी (3.28%) घसरला आहे आणि 42,666 वर व्यवहार करत आहे. मिड कॅपमध्येही 1450 अंकांनी (2.90%) घसरण झाली आणि तो 38,301 च्या पातळीवर आला आहे.

Share Market Crash

तब्बल 27 शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्सच्या 30 पैकी 27 शेअर्समध्ये घसरण झाली आहे आणि फक्त तीन शेअर्समध्ये तेजी आहे. निफ्टीच्या 50 समभागांपैकी ४५ खाली आहेत आणि फक्त ५ वर आहेत. आज एनएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीला लागले आहेत.

बॅंका आमि मेटल सर्वाधिक तोट्यात

निफ्टी आयटी ३.२७%, ऑटो २.६५%, मीडिया २.५०%, सार्वजनिक क्षेत्रातील बँका २.०५% आणि मेटल १.८२% ने सर्वात जास्त तोटा सहन करावा लागला. याशिवाय, फार्मा, बँकिंग, एफएमसीजी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस १% पर्यंत घसरले आहेत.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7.5 लाख कोटींची घट

शेअर बाजारात विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.५ लाख कोटी रुपयांची घट झाली. शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३८५ लाख कोटी रुपये होते. २७ फेब्रुवारी रोजी ते सुमारे ३९३ लाख कोटी रुपये होते.

गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले

फेब्रुवारी महिन्याने जगभरातील गुंतवणूकदारांच्या डोळ्यात आश्रूच पाहायला मिळाले आहेत. महिन्याच्या शेवटच्या दिवशीही बाजारात गुंतवणूकदारांना कोणताही दिलासा मिळत नाही. आज बाजार उघडताच भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 5.8 लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे बुडाले. एवढेच नाही तर शुक्रवारीच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टीचा कोणताही निर्देशांक हिरव्या चिन्हाच्या वर दिसला नाही. एकूणच, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 5.8 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

शेअर बाजार घरण्याची प्रमुख कारणं काय?

तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे आज जाहीर होतील. त्याआधी, गुंतवणूकदार सावध असतात. या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 6.3% दराने वाढण्याचा अंदाज आहे. सरकारी खर्चात वाढ झाल्यामुळे देशांतर्गत मागणीतील कमकुवतपणा भरून काढण्यास मदत झाली. तथापि, भविष्यातील वाढीचे अंदाज थोडेसे मर्यादित आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

दुसरे म्हणजे, गुरुवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील 25 % कर 4 मार्चपासून लागू होतील याची पुष्टी केली. याव्यतिरिक्त, 4 मार्चपासून चीनवर आधीच लादलेल्या 10% शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त 10% शुल्क लादले जाईल. यामुळे बाजारपेठेतील दबाव वाढला आहे. अमेरिकन आणि आशियाई बाजारपेठेत घसरण दिसून येत आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक व घसरण

27 फेब्रुवारी रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 556.56 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. 2025 मध्ये, परदेशी गुंतवणूकदारांनी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे भारतीय शेअर्स विकले आहेत. दरम्यान, या काळात म्युच्युअल फंडांसह देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) 83,000 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
जागतिक बाजारपेठेत 3% घसरण झाली.

27 फेब्रुवारी रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ५५६.५६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. या कालावधीत, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) १,७२७.११ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

27 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचा डाऊ जोन्स ०.४५% च्या घसरणीसह ४३,२३९ वर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक 1.59% वाढून 5,861 वर बंद झाला आणि Nasdaq 2.78% वाढून 18,544 वर बंद झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+