सीनिअर सिटीझनसाठी पोस्टाची खास योजना, दरमहा मिळेल 20 हजार पेन्शन
Post Office Scheme for Senior Citizens : जर तुम्ही निवृत्तीनंतर कोणावरही अवलंबून राहू इच्छित नसाल तर तुम्ही आजपासूनच पोस्ट ऑफिसच्या एका खास योजनेत गुंतवणूक सुरु करु शकता. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सिनिअर सिटीझन सेव्हिंग्स स्किममध्ये गुंतवणूक करुन प्रत्येक महिन्याला 20,000 रुपयांपर्यत पेन्शन मिळवू शकता.
1000 रुपयांची करावी लागेल गुंतवणूक
पोस्ट ऑफिस सीनिअर सिटीझन स्किमची खासियत ही आहे की, यात तुम्ही कमीत कमी 1000 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. ही स्कीम त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आहे ज्यांना निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन हवी आहे. यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किंवा दर तिमाहीला व्याज मिळेल. यामुळे तुमचा मासिक खर्च भागविणे सोपे जाईल.

तुम्ही देखील या स्कीममध्ये करु शकता गुंतवणूक
ही योजना 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. याशिवाय 55 ते 60 वर्षांपर्यंतचे व्हीआरएस घेणारे लोक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. संरक्षण सेवेतून निवृत्त कर्मचारी वयाच्या 50 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करु शकतात. तुम्ही तुमच्या पति किंवा पत्नीसोबत जाॅईंट खाते देखील उघडू शकता, ज्यामुळे दोघांना या योजनेचा फायदा होईल.
ज्येष्ठ नागरिक कोणत्याही बॅंक अथवा पोस्ट ऑफिससमध्ये आपले SCSS खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी कमीत कमी 1000 रुपये आण जास्तीत जास्त 30 लाख रुपये जमा करु शकता. तुम्ही यात 1000 रुपयांच्या पटीत रक्कम भरु शकता पण गुंतवणूक 30 लांखापेक्षा जास्त करता येत नाही.
दरमहा पेन्शन किती मिळेल?
या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 8.2 टक्के व्याज मिळते जे इतर योजनांच्या तुलनेत जास्त आहे. जर कुणी या योजनेत 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वर्षाला 2.46 लाख रुपये व्याज मिळेल, जे दर महिन्याला 20, 500 रुपये होते. हा अनियमित उत्पन्नाचा एक मजबूत स्त्रोत बनू शकतो जो निवृत्तीनंतर आर्थिक रुपात मदत करेल.
या योजनेत गुंतवणुकीचे फायदे
पोस्ट ऑफिस सीनिअर सिटीझन स्किम ही सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. ही योजना गुंतवणूकदारांना केवळ चांगला व्याजदरच देत नाही तर त्यांचे पैसे सुरक्षित ठेवते. त्यामुळे, जे निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्नाची योजना आखत आहेत ते या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.












Click it and Unblock the Notifications