WhatsApp वर या ट्रिकमुळे तुम्ही महत्त्वाचे कॉल चुकवणार नाही, कॉल कसे शेड्यूल करायचे ते जाणून घ्या
Whatsapp Call Schedule : हल्लीच्या दैनंदिन कामकाजातून अनेक वेळा महत्वाच्या कॉल करायचा असतो. पण आपण व्यस्त शेड्यलमुळे महत्वाचा कॉल करायचा विसरुन जातो. अशावेळी ते अडचणीचं ठरु शकतं. तुमच्यासोबतही असे होत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलो आहोत.
या ट्रिकचा तुम्हाला खूप फायदा होईल. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमचे महत्त्वाचे कॉल शेड्यूल करू शकता. ही ट्रिक वापर केल्यानंतर तुमचा कोणताही महत्त्वाचा कॉल चुकणार नाही. सर्व काही वेळेवर होईल.. व्हॉट्सअपवर वर कॉल शेड्यूल करण्याच्या प्रोसेस बद्दल जाणून घ्या.

व्हॉट्सॲपवर कॉल शेड्यूल कसे करावे?
व्हॉट्सॲपवर कॉल शेड्यूल कसे करावे? व्हॉट्सॲपवर कॉल शेड्यूल करण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची आवश्यकता नाही.
- कॉल शेड्यूल करण्यासाठी, प्रथम WhatsApp उघडा. यानंतर तुम्हाला ज्या ग्रुपवर कॉल करायचा आहे त्या ग्रुपवर जा.
- ग्रुपमध्ये प्रवेश केल्यानंतर, तुम्हाला मेसेज बारच्या खालच्या डाव्या बाजूला प्लस आयकॉन दिसेल, येथे क्लिक करा.
- फोटो, कॅमेरा, लोकेशन यासोबतच उजव्या बाजूला अनेक पर्यायही दिसतील. यापैकी इव्हेंट आयकॉनवर क्लिक करा.
- आता इव्हेंट तयार करा, इव्हेंटचे नाव टाइप करा आणि वेळ सेट करा.
- तुम्हाला लिंकद्वारे मीटिंग सुरू करायची असल्यास, टॉगल चालू करा.
- यामध्ये तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचा पर्याय निवड करू शकता. यानंतर, शेवटी सेंड ऑप्शनवर टॅप करा.
- प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुमचा कॉल शेड्यूल केला जाईल आणि तुम्ही तुमचे महत्त्वाचे कॉल अटेंड करणे चुकणार नाही.
शेड्यूल केलेला कॉल कसा रद्द करायचा
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कॉल शेड्यूल केला आहे. परंतु आता तो रद्द करू इच्छित असाल तर तुम्ही तो देखील रद्द करू शकता. तुम्हाला फक्त चॅट्सवर जावे लागेल, मीटिंग शेड्यूलमध्ये एडिट इव्हेंटवर करा वर क्लिक करा आणि नंतर कॅन्सलवर क्लिक करा. कॉल शेड्यूल रद्द होईल.












Click it and Unblock the Notifications