नवीन वर्षापासून लागू होणार हे 5 नियम, दैंनदिन जीवनावर होणार थेट परिणाम परिणाम
Rule Change from 1st Jan 2025: चालू वर्ष 2024 संपायला आता काही शिल्लक दिवस राहिले आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण तयारी करत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही बदलही होणार आहेत. हे नवे बदल 1 जानेवारीपासून लागू होतील. या बदलांचा देशभरातील नागरिकांच्या दैंनदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे.
नवीन वर्षात होणा-या बदलामध्ये LPG किमती, UPI पेमेंटसह अन्य काही नियमात बदल होणार आहेत. आर्थिक अपडेट्स दर महिन्याला येत असले तरी यावेळी नवीन महिना आणि नवीन वर्ष दोन्ही सोबत येत आहे... तर चला जाणून घेऊया नवीन वर्षात कोणते 5 मोठे बदल होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम होणार आहे.

एलपीजी किमती
1 जानेवारी 2025 पासून तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार आहे. यामध्ये स्वयंपाकघर आणि व्यावसायिक गॅस या दोन्ही दरांचा समावेश असणार आहे. सध्या 14 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत स्थिर आहे. मात्र त्यात बदल अपेक्षित आहे. याशिवाय विमान इंधनाच्या किमतीतही बदल दिसू शकतात.
EPFO चा नवा पेन्शन नियम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) 1 जानेवारीपासून पेन्शनधारकांसाठी नवीन नियम लागू होणार आहे. या अंतर्गत निवृत्तीवेतनधारक कोणत्याही अतिरिक्त पडताळणीशिवाय भारतातील कोणत्याही बँकेतून त्यांचे पेन्शन काढू शकतील. पेन्शनधारकांसाठी हा मोठा बदल मानला जात आहे.
शेअर मार्केटच्या एक्सपायरी डे मध्ये बदल
शेअर बाजाराशी संबंधित काही बदल 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत. यामध्ये मासिक मुदतीशी संबंधित बदलांचाही समावेश आहे. या अंतर्गत सेन्सेक्स, सेन्सेक्स-50 आणि बँकेक्स निर्देशांकांची मासिक मुदत आता शुक्रवारऐवजी मंगळवारी होईल. त्रैमासिक आणि सहामाही करारांची मुदत शेवटच्या मंगळवारी होणार आहे. दरम्यान NSE ने निफ्टी 50 च्या मासिक एक्स्पायरीसाठी गुरुवारची निवड केली आहे. हे बदल 1 जानेवारीपासून लागू होतील.
शेतकऱ्यांची कर्ज मर्यादा वाढणार
1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना वाढीव कर्ज मर्यादेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान आरबीआयने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्ज मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये केली आहे, ज्यामध्ये हमीशिवाय कर्ज उपलब्ध आहे.
UPI 123Pay व्यवहार मर्यादा वाढली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फीचर फोनद्वारे ऑनलाइन पेमेंट सक्षम करण्यासाठी UPI 123Pay लाँच केले आहे. याअंतर्गत 1 जानेवारीपासून व्यवहार मर्यादा 5,000 रुपयांवरून 10,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. वास्तविक मर्यादा वाढवण्याचा उद्देश या प्लॅटफॉर्मद्वारे मोठे व्यवहार सुलभ करणे हा आहे.












Click it and Unblock the Notifications