RBI MPC Meeting: दिवाळीपूर्वी गिफ्ट मिळणार! व्याजदरात कपात होणार? RBI एमपीसी बैठकीचे काऊंड डाऊन सुरु
RBI MPC Meeting Sep 2025 : जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर देशाला आणखी एक मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे, दिवाळीपुर्वी लवकरच व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने नुकतीच व्याजदरात कपात केल्यानंतर, आता संपूर्ण देशाचे लक्ष भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडे लागले आहे. त्यामुळे व्याजदरातील कपातीचा निर्णय होईल अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.
रिझर्व्ह बँकेची मौद्रिक नीति समिती (MPC) उद्या, २९ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत आपली तीन दिवसीय बैठक सुरू करत आहे. या बैठकीत रेपो रेट मध्ये कपात करण्यावर विचार केला जाईल, तसेच देशातील महागाईची (Inflation) परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेचा अंदाज यावरही सखोल चर्चा होणार आहे.

एमपीसी बैठकीची तारीख कालावधी
बैठकीची तारीख २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ असून या तीन दिवसीय १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता व्याजदरातील कपातीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. ही घोषणा आणि बैठकीचे अपडेट्स तुम्ही त्यासाठी RBI चे यूट्यूब चॅनल आणि X (ट्विटर) हँडलवर लाईव्ह पाहू शकता.
मागील रेपो रेट ५.५०% (सध्या स्थिर)
व्याजदर कपातीची शक्यता का आहे?
सध्याच्या परिस्थितीत रेपो रेट कपातीची शक्यता वाढली आहे, यामागील मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कमी झालेली महागाई: सध्या महागाई दर RBI च्या ४% च्या लक्ष्यापेक्षा खूप खाली आहे.
अमेरिकेतील टॅरिफचे आव्हान: भारतीय निर्यातीवर अमेरिकेने लावलेल्या ५०% पर्यंतच्या अतिरिक्त टॅरिफमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे.
विकास दराला प्रोत्साहन: जागतिक ब्रोकरेज फर्म नोमुराच्या (Nomura) मते, विकासाला चालना देण्यासाठी RBI रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट (०.२५%) पर्यंत कपात करण्याची शक्यता ७०% आहे.
मागील निर्णय: यापूर्वी जून २०२५ मध्ये RBI ने रेपो रेटमध्ये मोठी ५० बेसिस पॉईंट कपात करून तो ५.५०% वर आणला होता.
आरबीआयचा दृष्टिकोन
मागील बैठकीत रेपो रेट ५.५०% वर स्थिर ठेवून RBI ने तटस्थ (Neutral) भूमिका घेतली होती. सामान्य मान्सून, कमी महागाई आणि वाढलेल्या क्षमतेचा उपयोग यामुळे भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिली असल्याचे RBI ने नमूद केले होते. तरीही, निर्यात क्षेत्राला अमेरिकेच्या टॅरिफचा फटका बसण्याची आणि खासगी गुंतवणुकीतील मरगळ दूर करण्याची गरज असल्याने, दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना लोन स्वस्त होऊन व्याजदर कपातीचे गिफ्ट मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : ऐन सणासुदीत TV, AC आणि फ्रिज झाले स्वस्त! GST कपातीमुळे महाबचत, कोणती वस्तू किती रुपयांना? वाचा यादी












Click it and Unblock the Notifications