सोन्याचे भाव आकाशाला भिडले पण तरीही विकत घेतलं चक्क 25 टन सोनं! वाचा कोण आहे खरेदीदार?
RBI bought 25 tonnes of gold in a year : सोन्याचे दागिने हा सर्वांच्याच पसंतीचा आणि आवडीचा विषय पण सोन्याचे हल्ली भाव पाहून डोकं गरगरायला लागते अशातच आता सोन्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे, सोने खरेदी करायचेच झाले तर कुणीही किती करेल एक दोन तोळे खूप तर पाच ते पंधरा वीस तोळे पण ही माहिती ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल...!
सोन्याच्या किमती आवाक्यबाहेर गेल्या पण तरीही सोने खरेदी करणे सुरुच आहे. सोन्याचे भाव लाखाच्या आसपास पोहचल्यानंतर उत्सुकतेने खरेदी करण्याकडे फारसा कल कुणाचा नाही पण आरबीआय अशी संस्था आहे ज्यांनी एका वर्षात तब्बल 25 टन सोने खरेदी केले होय, विश्वास बसणार नाही पण सरकारने याविषयी आकडेवारीच जाहीर केली आहे.

आरबीआयकडे किती आहे सोने?
वृ्तानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक-आरबीआयकडे आर्थिक वर्ष 2024-25 च्या सहामाहीत जवळपास 25 टन सोने वाढले आहे. 5 मे रोजी यासंदर्भात सरकारने आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार आरबीआयकडे सद्यस्थितीत 879.59 एवढे सोने आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आरबीआयच्या तिजोरीत 57 टन सोने जमा झाले आहे. सोन्याच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्यानंतर ही मागील काही वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे.
- आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात रिझर्व्ह बँकेने परदेशी बँकामधून भारतात मोठ्या प्रमाणात सोने आणले.
- स्थानिक तिजोरीत सोन्याची एकूण प्रमाण 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 510.46 टन होते.
- 31 मार्च, 2024 रोजी हे प्रमाण 408 टनाहून अधिक होते.
- भू राजकीय तणावावेळी 1991 नंतर सर्वात जास्त सोने देशात आणण्यात आले.
- या ताज्या अहवालानुसार, एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा सहा महिन्याअगोदर 9.32 टक्के वाढला.
- मार्च 2025 च्या अखेरपर्यंत 11.70 टक्क्यांपर्यंत तो वाढला. सोन्याच्या साठ्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतातील सोने कुठे ठेवले जाते?
देशातील बहुतेक सोन्याचे साठे इंग्लंड आणि इतर परदेशी बँकांमध्ये ठेवलेले आहेत. 2024 च्या पहिल्या तिमाहीत, भारत सर्वात जास्त सोने खरेदी करणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर होता. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या असूनही हे पाऊल उचलण्यात आले आहे.
का वाढत आहेत सोन्याच्या किमती?
सोन्याच्या किमतीत वादळी वाढ झाली आहे. 10 ग्रॅमची किंमत 1 लाखांच्या पुढे गेली आहे. गुड रिटर्नसच्या वृत्तानुसार, केडिया ॲडव्हायझरीचे अजय केडिया म्हणाले की, सोन्याच्या किमतीतील ही वाढ अनेक जागतिक घडामोडींमुळे झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढत्या टॅरिफ तणावामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे. दरम्यान, डॉलरच्या निर्देशांकात घसरण होत होती आणि तो 98 च्या खाली घसरला होता.
सोन्याच्या दरवाढीला इतर कारणे
- रशिया आणि युक्रेन युद्धापासून मध्य पूर्व तणावापर्यंत भौगोलिक-राजकीय तणाव. या कारणांमुळे सोने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय बनला आहे.
- केंद्रीय बँकाही सोने खरेदी करत असल्याने भाववाढीचा फटका, ईटीएफचा प्रवाह कायम आहे.
- शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.












Click it and Unblock the Notifications